...तर पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार सलमान खानचा 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'?
By गीतांजली | Updated: October 22, 2020 13:34 IST2020-10-22T13:27:54+5:302020-10-22T13:34:50+5:30
सलमान खानचा आगामी चित्रपट'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' दीर्घकाळापासून चर्चेत आहे.

...तर पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार सलमान खानचा 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'?
सलमान खानचा आगामी चित्रपट'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' दीर्घकाळापासून चर्चेत आहे आणि चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी ईदच्या निमित्ताने हा सिनेमा रिलीज होणार होता, पण आधी चित्रपटाचे शूटिंग थांबले आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे थिएटर बंद झाले, त्यानंतर रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली .या सिनेमाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाही आणि आता २०२१मध्ये ईदच्या निमित्ताने राधे रिलीज होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, फिल्म मेकर्सनी 2021मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला सिनेमाची रिलीज डेट फायनल केली होती. मात्र अजून हे निश्चित झाले नाही कारण बहुतेक ठिकाणी थिएटर सुरु जरुर झाले आहे पण लोकांना केवळ 50% जागांवर बसण्याची परवानगी आहे. यानंतर निर्मात्यांनी असा विचार केला आहे की, ईदवर सलमानचे सिनेमा रिलीज होताच त्यामुळे पुढच्या वर्षीच्या ईदच्या निमित्ताने 'राधे' पण रिलीज करु.अद्याप याची कोणतीच ऑफिशियल अनाउसमेंट झालेली नाही.
'राधे'चे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. सलमानशिवाय यात दिशा पाटनी, जॉकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा यांच्या मुख्य भूमिका आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील सलमानने या सिनेमाचे 10 दिवस शूटिंग एनडी स्टुडिओमध्ये पूर्ण केले, ज्यात एक गाणं आणि क्लायमॅक्स शूट केले आहे. आता फायनल पॅचअप वर्क महबूब स्टुडिओमध्ये करण्यात येईल.