निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:01 IST2025-06-20T17:00:48+5:302025-06-20T17:01:21+5:30
Kajol : सध्या काजोल तिचा आगामी सिनेमा 'मां'मुळे चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकातील अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांची मुलं आता सिनेइंडस्ट्रीत प्रवेश करत आहेत. अभिनेत्री रवीना टंडन(Raveena Tandon)ची मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) हिने अलीकडेच तिच्या आईचा वारसा पुढे नेत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आता काजोलची मुलगी निसा देवगन (Nyasa Devgan) देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. नुकतेच यावर काजोल(Kajol)ने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या काजोल तिचा आगामी सिनेमा 'मां'मुळे चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या दरम्यान, काजोलने फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत निसा देवगन देखील तिचा वारसा पुढे घेऊन जाईल का, जसे राशा रवीनासाठी करत आहे, असे विचारण्यात आले. यावर काजोलने स्पष्ट उत्तर दिले आणि म्हणाली, "नाही, मला वाटत नाही की ती असे करेल. तिला चित्रपटांमध्ये इंटरेस्ट नाही. मला माझ्या कुटुंबातील सर्व मुले आवडतात आणि मला वाटते की त्यांनी असे काहीतरी करावे ज्यात त्यांना आनंद मिळतो आणि जे त्यांना वाटते ते ते करावे."
या दिवशी भेटीला येणार 'मां'
काजोलच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ती 'मां' या हॉरर ट्विस्ट चित्रपटातून मोठ्या पडद्यावर धमाल करणार आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित हा चित्रपट एक पौराणिक हॉरर ड्रामा आहे. या चित्रपटात रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता आणि खेरिन शर्मा यांच्याही भूमिका आहेत. याची कथा चंद्रपूरच्या एका काल्पनिक गावात घडते. ही एका आई आणि तिच्या मुलीची कथा आहे जी तिच्या पतीच्या गूढ मृत्यूनंतर त्यांच्या गावी जातात. तिथे त्यांना एका काळ्या अभिशापाबद्दल समजते जे त्यांचे जीवन धोक्यात आणतो. 'मां' हा चित्रपट २७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.