​...‘यामुळे’ प्रियांका नाही येणार करण जोहरच्या शोवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 13:03 IST2016-12-04T13:03:44+5:302016-12-04T13:03:44+5:30

‘कॉफी वुईथ करण’च्या पाचव्या पर्वात आतापर्यंत अनेक सुपरस्टार्स आले आणि बरेच ‘शॉकिंग’ खुलासे करून गेले. यंदाची खासियत म्हणजे बॉलीवूडमधील ...

This will not happen because of Priyanka's Johar's show | ​...‘यामुळे’ प्रियांका नाही येणार करण जोहरच्या शोवर

​...‘यामुळे’ प्रियांका नाही येणार करण जोहरच्या शोवर

ॉफी वुईथ करण’च्या पाचव्या पर्वात आतापर्यंत अनेक सुपरस्टार्स आले आणि बरेच ‘शॉकिंग’ खुलासे करून गेले. यंदाची खासियत म्हणजे बॉलीवूडमधील आतापर्यंत कधीही एकत्र न आलेल्या जोड्यांना करण बोलावत आहे. प्रियांकाला मात्र तो एकटाच बोलावणार असल्याची जोरदार चर्चा होती.

मात्र सुत्रांनुसार, यंदाच्या सीझनमध्ये प्रियांका हजेरी लावू शकणार नाही. ती न येण्यामागे तिची काही नाराजी वगैरी नाही तर वेळेचे गणित आहे. गेली अनेक महिने प्रियांका अमेरिकेत ‘क्वांटिको’ मालिकेची शूटींग करीत आहे. त्यातून एक महिना वेळ काढून ती भारतात परतणार आहे..

या महिनाभराच्या काळात इकडे रखडलेली सर्व काम पूर्ण करून पुन्हा हॉलीवूडला जाण्याचा तिचा प्लॅन आहे. म्हणून मग ती आल्यावर आगामी हिंदी चित्रपटांचे करार अंतिम करणे, स्वत:च्या प्रोडक्शन कंपनीतील सिनेमांना हिरवा कंदील दाखवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबियांना वेळ देणे याला ती प्राधान्य देणार.

तिच्या अशा अतिव्यस्त कार्यक्रमामुळे करणासोबत स्पाईसी गॉसिप करण्यास तिच्याकडे वेळच उरणार नाही. हेच कारण आहे की, ‘कॉफी वुईथ करण’मध्ये यावेळी ती दिसणार नाही. तिची हॉलीवूड डेब्यू फिल्म ‘बेवॉच’च्या निमित्ताने ती चॅट शोमध्ये हजेरी लावू शकते असा तर्क लावला जात होता.


कॉफी वुईथ करण : प्रियांका आणि करण जोहर 

दीपिका पदुकोन तिच्या ‘ट्रिपल एक्स’ को-स्टार विन डिझलसोबत करणच्या शोवर येणार असल्याचे बोलले जातेय. त्यामुळे प्रियांका तरी का मागे राहील? असे वाटायचे. आतापर्यंत करणसोबत आलिया भट, शाहरुख खान, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, वरुण धवन, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, रणवीर सिंग, परिणीती चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर यांनी कॉफी पिलेली आहे.

आगामी एपिसोडमध्ये आपल्याला सलमान त्याच्या दोन्ही भावांसोबत (अरबाज आणि सोहेल) तर शाहीद कपूर प्रथमच पत्नी मीरा राजपूतबरोबर दिसणार आहे. मागच्या सीझनमध्ये प्रियांका आणि दीपिका एकत्र आल्या होत्या.

Web Title: This will not happen because of Priyanka's Johar's show