‘माही वे’ साठी जरीन बनणार ‘पोल डान्सर’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 16:57 IST2016-11-16T16:57:55+5:302016-11-16T16:57:55+5:30

‘बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटीफुल’ जरीन खान सध्या कुठे हरवलीय? ‘हेट स्टोरी३’ नंतर ती बॉलिवूडमधून अचानक गायबच झाली? पण, आता जरीन ...

Will 'Junk' become 'Junk' Pol Dancer? | ‘माही वे’ साठी जरीन बनणार ‘पोल डान्सर’?

‘माही वे’ साठी जरीन बनणार ‘पोल डान्सर’?

ोल्ड अ‍ॅण्ड ब्युटीफुल’ जरीन खान सध्या कुठे हरवलीय? ‘हेट स्टोरी३’ नंतर ती बॉलिवूडमधून अचानक गायबच झाली? पण, आता जरीन तिच्या ‘हॉटनेस’ने चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुन्हा परतलीयं. होय, ‘वजह तुम हो’ या आगामी थ्रिलर चित्रपटात ती ‘पोल डान्सर’च्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागलीय. यासाठी तिने वजन घटवल्याचेही कळतेय. या भूमिकेसाठी जरीन सध्या पोल डान्सिंग तसेच सेक्सी मुव्ह्ज शिकतेय. तिच्यासोबत या चित्रपटात गुरमीत चौधरी, शर्मन जोशी, सना खान, रजनीश दुग्गल हे मुख्य भूमिकेत दिसतील. 

२००२ वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘काँटे’ या चित्रपटातील एका गाजलेल्या गाण्यावर जरीन पोल डान्स करणार आहे. हे गाणे म्हणजे,‘माही वे’. गौरव रोशीन यांनी संगीतबद्ध केलेले आणि नेहा कक्कड हिने गायलेले हेच गाणे या चित्रपटात वापरण्यात येणार आहे आणि यावर जरीन  पोल डान्सिंग करताना दिसणार आहे. कथानकात टिवस्ट येण्याच्या वेळेला हे गाणे असेल. मुळ गाण्यात मलायका अरोरा खान हिला परफॉर्मन्स करतांना आपण पाहिले होते.  

‘हेट स्टोरी ३’ चित्रपटासाठी जरीनने बरेच प्रचंड घटवले होते. या चित्रपटात काम करण्यासाठी सलमान खान जरीनची सर्वांत मोठी प्रेरणा होता. त्याच्यामुळेच तिला ‘हाऊसफुल्ल’ नंतर मोठा ब्रेक मिळाला.  

Web Title: Will 'Junk' become 'Junk' Pol Dancer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.