शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर पत्नी गौरीने दिली अशी रिअ‍ॅक्शन, म्हणाली - ओह गॉड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:26 PM2022-09-26T13:26:35+5:302022-09-26T13:27:15+5:30

Shah Rukh Khan: शाहरुख खानने नुकताच शर्टलेस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Wife Gauri's reaction to Shah Rukh Khan's shirtless photo said - Oh God! | शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर पत्नी गौरीने दिली अशी रिअ‍ॅक्शन, म्हणाली - ओह गॉड!

शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर पत्नी गौरीने दिली अशी रिअ‍ॅक्शन, म्हणाली - ओह गॉड!

googlenewsNext

शाहरुख खान(Shah Rukh Khan)ने रविवारी शर्टलेस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत त्याचे टोन्ड अ‍ॅब्स आणि मोठे केस दिसत आहेत. या फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. या फोटोवर युजर्सच्या अनेक कमेंट्स आल्या, पण सर्वात मजेशीर कमेंट त्याची पत्नी गौरी खानने केली आहे. 

शर्टलेस फोटोसह अभिनेता शाहरूख खानने त्याच्या चित्रपटाचे गाणे कॅप्शनमध्ये लिहिले. जे त्याच्या शर्टसाठी लिहिले होते. त्याने लिहिले, तुम होती तो कैसा होता...तुम इस बात पर हैरां होती, तुम इस बात पर कितनी हंसी.......तुम होती तो ऐसा होता..'" आगे उन्होंने लिखा, "मुझे भी #पठान का इंतजार है.


गौरी खानने या पोस्टवर लिहिले की, "अरे देवा! आता तो त्याच्या शर्टशीही बोलत आहे......!!!!" या फोटोवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढाने लिहिले, "जे लग्न करणार आहेत... त्यांना सावधगिरी बाळगावी लागेल". टायगर श्रॉफने लिहिले, "मी एक दिवस विश्रांती घेण्याचा विचार करत होतो आणि मग मी तुला पाहिले. लिजेंड". गायक अमाल मलिक यांनी लिहिले, "संपलो" त्यासोबत त्याने फायर आणि हार्टचे इमोटिकॉन जोडले.

शाहरुख खानसोबत सिद्धार्थ आनंदच्या पठाण या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. यशराज फिल्म्स निर्मित हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये तो रिलीज होणार आहे.

Web Title: Wife Gauri's reaction to Shah Rukh Khan's shirtless photo said - Oh God!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.