शाहरुख खानच्या सिनेमामुळे बंद पडला 'मुन्नाभाई ३'? अखेर 'सर्किट'ने केला खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:32 IST2025-12-29T12:28:00+5:302025-12-29T12:32:14+5:30
'मुन्नाभाई चले अमेरिका' अर्थात 'मुन्नाभाई ३' सिनेमा बंद का पडला? यामागील कारण अर्शद वारसीने सांगितलं आहे

शाहरुख खानच्या सिनेमामुळे बंद पडला 'मुन्नाभाई ३'? अखेर 'सर्किट'ने केला खुलासा, म्हणाला...
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'मुन्नाभाई' सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी 'मुन्नाभाई चले अमेरिका' हा तिसरा भाग घेऊन येणार होते. मात्र इतकी वर्षे उलटूनही हा चित्रपट का बनू शकला नाही, यावर आता अभिनेता अर्शद वारसीने मौन सोडले आहे.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अर्शद वारसीने सांगितले की, '''मुन्नाभाई ३' आणि शाहरुख खानचा 'माय नेम इज खान' या सिनेमांची कथा बऱ्यापैकी सारखी होती. कारण यात मी आणि संजय दत्त अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भेटायला जातो. आणि माय नेम इज खानमध्ये शाहरुखही राष्ट्रपतींना भेटतो. राजू हिरानीला एखादी गोष्ट सारखी असेल तर खूप त्रास होतो. ओह माय गॉड आणि पीके सिनेमांची कथा सारखी होती म्हणून त्याला मध्यंतरानंतरचा सिनेमा तीन वेळा लिहावा लागला होता.''
''त्यानंतर सगळी प्रोसेस खूप संथ झाली. त्यामुळे सिनेमा बनवून काही उपयोग नव्हता. आता जेव्हा आम्ही काही दिवसांपूर्वी बोललो तेव्हा मला कळालं की, 'मुन्नाभाई ३'साठी तीन स्क्रीप्ट रेडी आहेत. सध्याचे जे बॉलिवूड सिनेमे आहेत त्यांच्यापेक्षा दहापटीने या स्क्रीप्ट चांगल्या आहेत. आता यापैकी एक स्क्रीप्ट जेव्हा लॉक होईल तेव्हा कदाचित हा सिनेमा बनू शकेल.''