सोनम कपूरच्या आयुष्यात कोणी तरी येणार गं ? 'हा' फोटो आहे पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 10:49 IST2020-03-18T10:48:27+5:302020-03-18T10:49:10+5:30

सोनम कपूरने 2018 मध्ये आनंद आहुजा या बिझनेसमनसह लग्नबंधनात अडकली होती.

Why Sonam Kapoor Ahuja keeping the pregnancy a secret ? Know The Reason-SRJ | सोनम कपूरच्या आयुष्यात कोणी तरी येणार गं ? 'हा' फोटो आहे पुरावा

सोनम कपूरच्या आयुष्यात कोणी तरी येणार गं ? 'हा' फोटो आहे पुरावा

बॉलीवुडची मस्सकली सोनम कपूरचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. कारण लवकरच ती गुड न्यूज देणार असल्याचे समजतयं.  कपूर घराण्याच्या आनंदाला तर पारावारच उरलेला नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळतंय. यावर अजूनतरी सोनमकपूर कडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली  नसली तरी तिचे काही फोटोच या गोष्टीचा पुरावा असल्याचे समजतंय. त्यामुळे या फोटोमुळे सोनम आणि आनंदच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे बोललं जात आहे. 

 

काही दिवसांपूर्वीच तिने पती आनंद आहुजासह फोटो शेअर केला होता. यात तिचा बेबी बंम्प दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यामुळे हा फोटो समोर आल्यापासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. कोणत्याही सामान्य मुलीची अशा  परिस्थितीत अवस्था असेल तशीच सोनमचीही झाली असणार.


सोनमने 2018 मध्ये आनंद आहुजा या बिझनेसमनसह लग्नबंधनात अडकली होती. सोनमने तिच्या रिलेशशीपबाबतही कधीच मनमोकळेपणाने बोलली नव्हती. थेट लग्नाची बातमी देत तिने अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. अगदी त्याचप्रमाणे तिने तिची प्रेग्नंसीबाबतही गुप्तप्ता पाळली आहे. सध्या सोनम पती आनंदसह लंडनमध्ये आहे.  लग्नानंतर ती फारशी सिनेमातही झळकली नाही.निरजा आणि झायो फॅक्टर या दोन सिनेमानंतर ती बालिवूडपासून लांब गेली. सध्या ती कोणत्या बाँलिवूड पार्ट्या आणि कोणत्याच पुरस्कार सोहळ्यांमध्येही दिसली नाही. 
 

Web Title: Why Sonam Kapoor Ahuja keeping the pregnancy a secret ? Know The Reason-SRJ