का असते श्रद्धाची रटाळ ड्रेसिंग स्टाइल ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 10:24 IST2016-10-26T18:14:28+5:302016-10-28T10:24:45+5:30
बॉलीवुडमध्ये सेलिब्रिटींच्या ड्रेसिंग स्टाईलच्या ना ना त-हा पाहायला मिळतात. यातील काहींच्या ड्रेसिंग स्टाइल्स सा-यांनाच भावतात तर काहींच्या ड्रेसिंग स्टाइल ...

का असते श्रद्धाची रटाळ ड्रेसिंग स्टाइल ?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">बॉलीवुडमध्ये सेलिब्रिटींच्या ड्रेसिंग स्टाईलच्या ना ना त-हा पाहायला मिळतात. यातील काहींच्या ड्रेसिंग स्टाइल्स सा-यांनाच भावतात तर काहींच्या ड्रेसिंग स्टाइल पाहून रसिकही नाक मुरडतात. बी-टाऊनमध्ये सध्या सोनम कपूरला स्टाइल आयकॉन म्हणून ओळखले जाते. कार्यक्रम कुठलाही असो त्या कार्यक्रमाला साजेशी आणि त्याला अनुसरुनच सोनमची ड्रेसिंग स्टाईल असते. त्यामुळे सोनमच्या ड्रेसिंग स्टाईलची सगळीकडेच चर्चा होते. त्यावर भरभरुन कमेंट दिल्या जातात अन् माध्यमांकडूनही तिची तितकीच दखल घेतली जाते. याशिवाय आलिया भट्ट, बॉलीवुडची बेगम अर्थात करीना कपूर-खान, दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफच्या ड्रेसिंगवरही रसिक तितकेच फिदा असतात आणि ते या सेलिब्रिटींना फॉलो करण्याचा प्रयत्नही करतात. मात्र या सगळ्या सेलिब्रिटींमध्ये अपवाद ठरते ती बॉलीवुडची आशिकी गर्ल अर्थात श्रद्धा कपूर तेही तिच्या अवाक करणा-या स्टाइलमुळे.
कोणत्याही कार्यक्रमात श्रद्धा हजेरी लावते तेव्हा कुणीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. तिची ड्रेसिंग स्टाइल पाहून ओठावर आपसुकच एक प्रश्न येईल तो म्हणजे तिची ड्रेसिंग स्टायलिस्ट कोण ? तिला अशाप्रकारचे ड्रेस कोण बरं सुचवत असेल असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले नाही तरच नवल. याचे कारण म्हणजे श्रद्धा कधी अति भडक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते तर कधी लायनिंग असणा-या ड्रेसमध्ये तर कधी तिलाच अवघडल्यासारखे वाटेल अशा कपड्यांमध्ये ती सा-यांसमोर अवतरते.
तिचा अभिनय, तिचे चार्मिंग दिसणे, तिची प्रत्येक अदा तिचे सौंदर्य सारे काही रसिकांना घायाळ करणारे असले तरी तिची ड्रेसिंग स्टाइल फारच रटाळ असते. त्यामुळे श्रद्धाची हीच अजब ड्रेसिंग स्टाइल सध्या चर्चेचा विषय ठरलीय.
नुकतेच 'रॉक ऑन -2' च्या ट्रेलर लॉन्चला श्रद्धा स्टेजवर अवतरली त्यावेळी उपस्थित अचंबित झाले. याला कारण ठरला तो तिचा ट्रान्सपरन्ट (पारदर्शक) ड्रेस. इतक्या ट्रान्स्परन्ट ड्रेसमध्ये श्रद्धाला आजवर कुणीही पाहिले नव्हते. काळ्या रंगाच्या ट्रान्स्परन्ट ड्रेसमध्ये श्रद्धा सा-यांसमोर येताच उपस्थितांनी तिचे स्वागत केले खरे. मात्र या ड्रेसमध्ये श्रद्धा थोडी अवघडल्यासारखीच वाटली.
असाच काहीसा प्रकार बागी सिनेमाच्या सक्सेस पार्टीवेळीसुद्धा पाहायला मिळाला. यावेळी श्रद्धाने परिधान केलेल्या वनपीसवर लाल रंगाचे पॅचेस होते. यावेळी तिच्या ड्रेसिंग स्टाइलवरुनही श्रद्धाला टीकेचा सामना करावा लागला.
कधी श्रद्धाने ग्राफिक्स प्रिंट सारखा असलेला ड्रेस परिधान केलेला ड्रेसमध्ये श्रद्धावर वेगवेगळी विशेषणे लावत टीका करण्यात आली.
तर कधी पारंपरिक फुलांच्या डिझाईन असलेल्या साडीत ती सा-यांसमोर अवतरली. श्रद्धाच्या या आगळ्या वेगळ्या आणि तितक्याच विचित्र कपड्यांमुळे ओठावर एकच शब्द म्हणजे गजब श्रद्धा की अजब स्टाइल.