मलायकाला पुन्हा व्हायचे खान कुटुंबाची सून, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 12:23 IST2020-07-13T12:17:55+5:302020-07-13T12:23:52+5:30

मलायकाने खान कुटुंबाबद्दल सांगितले की, कुटुंबात सगळ्यांबरोबर खूप चांगले बॉन्डींग निर्माण झाले होते. अरबाजच्या घरी वातावरण अगदी माझ्या घरासारखेच आहे.

Why Malaika Aroras wanted to be Daughter in law of the khan family again | मलायकाला पुन्हा व्हायचे खान कुटुंबाची सून, कारण वाचून व्हाल हैराण

मलायकाला पुन्हा व्हायचे खान कुटुंबाची सून, कारण वाचून व्हाल हैराण

छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा खूप सुरू असतात. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. तसेच नेहमी लग्नाच्याही चर्चा रंगत असतात. या अफेयरबाबत मलायकाही आता वेळोवेळी आपले मत मांडत असते. आज मलायका अर्जुनसोबत असूनही अरबाज खानला विसरलेले नाही. म्हणूनच एका मुलाखतीत तिने अरबाजविषयी कुटुंबासह चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या.

तिने सांगितले होते की,अरबाजच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या कुटुंबाने माझे खूप चांगले स्वागत केले आणि तिथे आल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. मलायकाने खान कुटुंबाबद्दल सांगितले की, कुटुंबात सगळ्यांबरोबर खूप चांगले बॉन्डींग निर्माण झाले होते. अरबाजच्या घरी वातावरण अगदी माझ्या घरासारखेच आहे.

अरबाजचे कुटुंब असं होतं की त्यांनी कधीही माझ्यावर दबाव आणला नाही.कधीच त्यांनी कोणत्या गोष्टी करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकले नाही. अरबाजच्या कुटूंबाने कोणतेही सर्वसामान्य नियम पाळण्यास  माझ्यावर दबाव आणला नाही.

 

 

पहिल्याच दिवशी अरबाजच्या कुटूंबाने माझे स्वागत केले, तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही असे सांगत जुन्या दिवसांच्या आठवणींना ऊजाळा दिला होता. 

Web Title: Why Malaika Aroras wanted to be Daughter in law of the khan family again