४५० कोटींची संपत्तीचे मालक असूनही कुटुबांला सोडून धर्मेंद्र फार्महाऊसवर राहतात, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:34 IST2025-11-11T11:23:34+5:302025-11-11T11:34:27+5:30
धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक, व्हेंटिलेटरवर ठेवल्यानं चाहत्यांची काळजी वाढली

४५० कोटींची संपत्तीचे मालक असूनही कुटुबांला सोडून धर्मेंद्र फार्महाऊसवर राहतात, कारण काय?
बॉलिवूडचे 'ही-मॅन' आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या कलाकारांनी रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत असून चाहते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. ४५० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक धर्मेंद्रजी हे त्यांच्या मुंबईतील आलिशान घराऐवजी फार्महाऊसवर का राहतात, हा प्रश्न अनेकांना पडतो.
धर्मेंद्र वारंवार फार्महाऊसवरील नैसर्गिक आणि साध्या जीवनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. शहराचा गजबजाट टाळून शांत वातावरणात आयुष्य व्यतीत करण्यासाठी ते फार्महाऊसवर राहतात. फार्महाऊसवर एकटे नसतात. तर त्यांच्यासोबत त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरदेखील राहतात. याबद्दल त्यांचा लेक आणि अभिनेता बॉबी देओलनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
धर्मेंद्र यांचं फार्महाऊस कुठे आहे?
धर्मेंद्र यांचं फार्महाऊस खंडाळा येथे आहे. खंडाळा हे मुंबई आणि पुणे दरम्यान सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेले एक शांत आणि निसर्गरम ठिकाण आहे. त्यांचं फार्महाऊस हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं असून, तेथे फळबागा, शेती आणि जनावरं आहेत. ते त्यांचं सर्वात आवडतं ठिकाण आहे. कारण, तिथे ते शेती आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येतो.