'अरे यार एफबी तू क्यों नहीं खुलता है मेरे लिए'....अमिताभ बच्चन यांची पुन्हा तक्रार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 10:38 IST2017-07-03T05:08:04+5:302017-07-03T10:38:04+5:30
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन पुन्हा एकदा फेसबुकवर नाराज आहेत. होय, आपल्या फेसबुक अकाऊंटवर ते कमालीचे नाराज आहे. फेसबुकच्या सर्व ...
.jpg)
'अरे यार एफबी तू क्यों नहीं खुलता है मेरे लिए'....अमिताभ बच्चन यांची पुन्हा तक्रार!!
ब लिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन पुन्हा एकदा फेसबुकवर नाराज आहेत. होय, आपल्या फेसबुक अकाऊंटवर ते कमालीचे नाराज आहे. फेसबुकच्या सर्व फीचर्सचा वापर करू शकत नसल्याबद्दल त्यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तेही अगदी ‘शायराना’ अंदाजात. ‘अरे यार एफबी, तू क्यों नहीं खुलता है मेरे लिए फुल में... डालना है यार उसमें कुछ बातें मेरी!!’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
{{{{twitter_post_id####
काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत तक्रार केली होती. ‘हॅलो फेसबुक ! जागो! माझे फेसबुक पेज पूर्णपणे उघडत नाहीय. कित्येकदिवसापासूनची ही तक्रार आहे. अखेर मला याची तक्रार करण्यासाठी अन्य एका माध्यमाची मदत घ्यावी लागली,’ असे अमिताभ यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे ही तक्रार करताना अमिताभ यांनी स्वत:चा अँग्री यंग मॅन लूकमधील एका फोटोचा वापर केला होता. पण कदाचित याचा काहीही फायदा झाला नाही. कारण पहिल्या तक्रारीचा फायदा झाला असता तर अमिताभ यांना दुस-यादा तक्रार करावी लागली नसती.
अमिताभ यांचे फेसबुक व ट्विटरवर २.७० कोटी फॉलोअर्स आहेत. अमिताभ या दोन्ही सोशल नेटवर्कींग साईटवर कमालीचे अॅक्टिव्ह असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक घडामोडी ते यामाध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असतात. एवढेच नाही तर ते ब्लॉगही लिहिलात. गेल्या अनेक वर्षांपासून ते ब्लॉग लिहित आहेत. सध्या अमिताभ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहेत. याशिवाय ‘102 नॉट आऊट’ या चित्रपटातही ते झळकणार आहेत. यात त्यांच्यासोबत ऋषी कपूर दिसणार आहेत.
{{{{twitter_post_id####
}}}}T 2472 - Arre yaar FB .. tu kyun nahin khulta hai mare liye full mein .. dalna hai yaar usme kuch baatein meri .. !! pic.twitter.com/k6HkGkmtF0— Amitabh Bachchan (@SrBachchan) 1 July 2017