आमिर खानच्या घरी का गेलेले आयपीएस अधिकारी?, खरं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:49 IST2025-07-28T15:48:36+5:302025-07-28T15:49:35+5:30
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) यांच्या निवासस्थानी नुकतेच काही आयपीएस ट्रेनी अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीमागील खरी कारणं आता स्पष्ट झाली आहे.

आमिर खानच्या घरी का गेलेले आयपीएस अधिकारी?, खरं कारण आलं समोर
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) यांच्या निवासस्थानी नुकतेच काही आयपीएस ट्रेनी अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीमागील खरी कारणं आता स्पष्ट झाली आहे. आमिर खान यांच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, या बॅचमधील आयपीएस ट्रेनी अधिकारी आमिर खान यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यामुळे आमिर खान यांनी त्यांना त्यांच्या घरी बोलावले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
यासंदर्भात एक व्हिडीओही समोर आला होता, ज्यामध्ये अनेक आयपीएस अधिकारी एक आलिशान बसमधून उतरून आमिर खान यांच्या इमारतीत जाताना दिसत होते. या घटनेनंतर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. काही जण म्हणाले की, आमिर खान एखादा असा प्रोजेक्ट करीत आहेत, ज्यामध्ये सुरक्षेची गरज आहे. विशेषतः त्याच्या काही लक्झरी कार्सबाबतच्या बातम्यांमुळे टीम चिंतेत होती. मात्र हे स्पष्ट झाले आहे की, आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून विविध बॅचमधील आयपीएस ट्रेनींना भेटत आले आहेत. त्यांच्या सर्फरोश या चित्रपटानंतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आमिर खान यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सितारे जमीन पर' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या ते या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंग्स आयोजित करत आहेत आणि लवकरच आमिर खान प्रॉडक्शन्सच्या आगामी प्रोजेक्टविषयी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. अभिनयाच्या बाबतीत, आमिर खान सध्या कुली या चित्रपटात झळकणार असून, त्यात ते सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करतील. त्याशिवाय, ते लोकेश कनगराज दिग्दर्शित एका नव्या चित्रपटातदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.