​ श्रीदेवीची दुसरी मुलगी का आली चर्चेत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 13:39 IST2016-11-24T13:39:40+5:302016-11-24T13:39:40+5:30

       श्रीदेवीची मुलगी जान्हवी आता करण जोहरच्या सैराटमध्ये आर्चीच्या भूमिकेत पाहायला मिळणार या गोष्टीचा बॉलिवूडमध्ये चांगलाचा बोलबाला ...

Why did Sridevi's second daughter talk about? | ​ श्रीदेवीची दुसरी मुलगी का आली चर्चेत ?

​ श्रीदेवीची दुसरी मुलगी का आली चर्चेत ?

 
   श्रीदेवीची मुलगी जान्हवी आता करण जोहरच्या सैराटमध्ये आर्चीच्या भूमिकेत पाहायला मिळणार या गोष्टीचा बॉलिवूडमध्ये चांगलाचा बोलबाला झाला होता. त्यानंतर जान्हवीच्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. अचानक जान्हवी या गोषटीमुळे प्रकाशझोतात आली होती. परंतू आता जान्हवी नाही तर श्रीदेवीची दुसरी मुलगी खुशी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तुम्ही म्हणाल की खुशीने असे केले तरी काय? तिला पण एखादा बिग बजेट चित्रपट मिळाला का? तर तसे बिलकुलच काही नाहीये. नुकतीच खूशी पारदर्शक टॉपमध्ये बिनधास्त वावरताना आढळली. इतकेच नाही तर तिने या ड्रेसमध्ये फोटोसाठी पोजही दिल्या. अलिकडेच मुंबईत पार पडलेल्या ग्लोबल सिटीझन फेस्टीव्हलसाठी असंख्य बॉलिवूड सेलिब्रेटी हजर होते. यात श्रीदेवीच्या दोन्ही मुलींनीही हजेरी लावली होती. बॉलिवूडमध्ये पदार्पणसाठी सज्ज असलेली जान्हीवी सध्या बरीच चर्चेत आहे. तिच्यासोबत बहिण खूशीनेही सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या. यावेळी खूशीने घातलेला ड्रेस आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला. तिने परिधान केलेला काळा टॉप खूपच पारदर्शक होता. यातून तिचे अंतर्वस्त्रे स्पष्ट दिसत होती. तिने परिधान केलेली जीन्सही खूप स्टायलिश होती. तिच्या घुडघ्याच्या वरचा भाग फाटलेला होता. फॅशनच्या भाषेत याला रिप्ड म्हणतात. त्यामुळे जान्हवी इतकेच कॅमेºयांंची नजर खूशीवरही होती. दोघी बहिणी आई श्रीदेवीसोबत आल्या होत्या. या कार्यक्रमाला शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, मंदिरा बेदी, सोफी चौधरी,  सोनाली बेन्द्रे यांच्यासह अमिताभ बच्चनसारखे दिग्गज कलाकार हजर होते. आता खुशीचा हा बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटिफुल अंदाज पाहता लवकरच ती अपल्याला एखाद्या चित्रपटात दिसू  शकते.

Web Title: Why did Sridevi's second daughter talk about?