'चड्डी बनियान बिक जाएगी...', असं का म्हटलं शाहरूख खाननं आमिर आणि सलमानच्या बाबतीत...?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 11:07 AM2022-09-02T11:07:37+5:302022-09-02T11:08:26+5:30

Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या तिन्ही खानांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना चाहत्यांना पाहायचे आहे. यावर शाहरुख खानने केलेले विधान चर्चेत आले होते.

Why did Shahrukh Khan say that 'Chaddi Baniyan Bik Jayegi...' about Aamir and Salman...? | 'चड्डी बनियान बिक जाएगी...', असं का म्हटलं शाहरूख खाननं आमिर आणि सलमानच्या बाबतीत...?

'चड्डी बनियान बिक जाएगी...', असं का म्हटलं शाहरूख खाननं आमिर आणि सलमानच्या बाबतीत...?

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हटलं की सर्वात आधी तीन खानांचं नाव घेतलं जातं. शाहरूख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) या बॉलिवूडमधील खानांची क्रेझ चाहत्यांमध्ये खूप आहे. त्यांच्या चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट पाहत असतात. या तिघांनी एकत्र आतापर्यंत काम केलेले नाही. सलमान खान आणि शाहरूख खानने बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. तर आमिर खान आणि सलमान खानने 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात एकत्र काम केलेले आहे. मात्र या तिघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्याचे चाहत्यांचं स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही.

हाच प्रश्न जेव्हा शाहरूख खानला जेव्हा एका शोमध्ये विचारण्यात आला तेव्हा त्याने त्यावर प्रतिक्रिया दिली होती. शोमध्ये जेव्हा त्याला विचारले गेले की, कोणत्या चित्रपटात तिन्ही खानांना एकत्र पाहायला मिळतील ? यावर शाहरूख खानने उत्तर दिले की तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर ऑफर द्या आम्ही करतो.


किंग खान पुढे म्हणाला की, चड्डी बनियान बिक जाएगी...तिघांंना साइन करता करता. या शोदरम्यान त्याने उदाहरण देताना सांगितले होते की, तिघांना एकत्र साइन करणं निर्माता-दिग्दर्शकाला खूप कठीण जाईल. सर्वात आधी तिघांना कथा ऐकावी लागले मग तिघांना भूमिकादेखील भावली पाहिजे.


बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो मागील चार वर्षांपासून रुपेरी पडद्यावरून गायब होता. शेवटचा तो झिरोमध्ये दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय यांनी केले होते. या चित्रपटाकडून अभिनेत्याला खूप अपेक्षा होत्या पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर शाहरूख बराच काळ सिनेमात पाहायला मिळाला नाही. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर शाहरूख खान एक नाही तर तीन सिनेमांतून कमबॅक करतो आहे. त्याचा पहिला चित्रपट पठान २५ जानेवारीला रिलीज होत आहे. त्यानंतर जवान जूनमध्ये आणि डंकी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Why did Shahrukh Khan say that 'Chaddi Baniyan Bik Jayegi...' about Aamir and Salman...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.