"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 09:31 IST2024-10-10T09:29:32+5:302024-10-10T09:31:18+5:30

Salman Khan And Iulia Vantur : बॉलिवूडमध्ये अनेकदा सलमान खानच्या अफेयर्सच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. गेल्या बऱ्याच काळापासून अभिनेत्री आणि मॉडेल युलिया वंतूर सलमान डेट करत असल्याचे बोलले जाते.

Why did Iulia Vantur say "I will remember him" on hearing Salman Khan's name? | "मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?

"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?

बॉलिवूडमध्ये अनेकदा सलमान खान(Salman Khan)च्या अफेयर्सच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. गेल्या बऱ्याच काळापासून अभिनेत्री आणि मॉडेल युलिया वंतूर (Iulia Vantur) सलमान डेट करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र अनेकदा त्यांना एकत्र पाहिले गेले आहे. युलिया भाईजानच्या कुटुंबाच्याही खूप जवळ आहे.

युलिया वंतूर मागील महिन्यात आयोजित केलेल्या आयफा अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती. पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एन्ट्री केल्यानंतर तिला तिचा कथित बॉयफ्रेंड सलमान खानबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सर्व अवाक् झाले आहेत. 

व्हायरल होतोय व्हिडीओ
खरेतर युलिया वंतूरला विचारण्यात आले की, ती सलमान खानला मिस करते आहे का? त्यावर ती म्हणाली की, तो माझ्या हृदयात आहे. मी त्याला का मिस करेन. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला युलिया वंतूरची बर्थडे पार्टी खूप चर्चेत आली होती. ती सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ असल्याने अनेकदा चर्चेत येत असते. या पार्टीतले त्यांचा एक फोटो व्हायरलदेखील झाला होता ज्यात ती सलमान खान सोबत दिसली होती. हा फोटो सोशल मीडियावर बराच काळ चर्चेचा विषय बनली होती.

Web Title: Why did Iulia Vantur say "I will remember him" on hearing Salman Khan's name?