‘सलमान खानचे चाहते ट्विंकल खन्नाला का देत आहेत धमक्या’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 17:54 IST2016-12-26T16:33:20+5:302016-12-26T17:54:29+5:30
यात काहीच शंका नाही की, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाची विनोदबुद्धी कमाल आहे. आणि तिच्या याच विनोदबुद्धीमुळे यापूर्वी तिला ...

‘सलमान खानचे चाहते ट्विंकल खन्नाला का देत आहेत धमक्या’
य त काहीच शंका नाही की, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाची विनोदबुद्धी कमाल आहे. आणि तिच्या याच विनोदबुद्धीमुळे यापूर्वी तिला अनेक वादांचा सामना करावा लागला आहे. मग ते चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य वाजवण्याच्या निर्णयावर टीका असो वा ‘कॉफी विथ करण’ या शोवर पती अक्षयबद्दल नको ते कमेंट करणे, ट्विंकल काही गप्प बसत नाही.
यावेळी मात्र तिने सलमान खानवर टिप्पणी करून त्याच्या ‘डाय हार्ड’ चाहत्यांचा रोष ओढावून घेतला. नुकतेच एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या स्तंभात तिने सलमानच्या अविवाहितपणावर मजेशरी लेख लिहिला. त्यामध्ये तिने सल्लूमियाँच्या लग्नाची जाहीरात कशी असेल तेदेखील लिहिले.
‘भारतातील सर्वात वयोवृद्ध पण आकर्षक अविवाहित पुरुषासाठी वधू पाहिजे. मुलगा डॅशिंग, मांसाहारी, यशस्वी आणि पीळदार शरीरयष्टी आणि खानदानी आहे. तो नृत्य, अभिनय आणि कलेत पारंगतदेखील आहे. वधू दिसायला अतिशय सुंदर, सडपातळ आणि ओबडधोबड रस्त्यावरून लाँग ड्राईव्हवर जाण्याची आवड असणारी हवी. शिवाय ती जास्त बडबडी असू नये. कारण मुलाला ‘बकबक’ करणारे लोक मुळीच सहन होत नाही. जातीचा तर प्रश्नच नाही. सलमान@भाईजान.कॉम वर तुम्ही संपर्क साधू शकता.’
ट्विंकलचे हे शब्द वाचून सलमानच्या चाहत्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाही. सलमान-अक्षय एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र असून भाईजानने अक्षयच्या ‘रुस्तम’चे वैयक्तिक प्रोमोशन केले होते. एवढेच नाही तर अक्षयचा आगामी ‘२.०’चा फर्स्ट लूकदेखील त्याने ट्विटरवर लाँच केला होता. त्यामुळे त्याच्या पत्नीने सलमानविषयी असे उपहासात्मक लिहिणे चाहत्यांना फारसे रुचले नाही.
![Salman With Twinkle]()
तिचा निषेध म्हणून सोशल मीडियावर लोकांनी अक्षयच्या ‘जॉली एलएलबी’ चित्रपटावर बंदी घालण्याची धमकी दिली. एकाने तर तिच्यावर वैयक्तिक टीका करताना ट्विंकलला विचारले की, ‘सलमानसारखे अविवाहित राहणे चांगले आहे की, बेस्ट फें्रड शिल्पा शेट्टीला धोका देऊन तिचा बॉयफ्रेंड अक्षयशी लग्न करणे?’
‘ट्विंकल सलमानविषयी बोलण्या आगोदर दोनदा विचार कर’ असा सल्लाहीदेखील तिला देण्यात आला. ‘सलमानचा चाहता असण्याचा मला गर्व आहे आणि मी ‘जॉली एलएलबी’ पाहणार नाही असे घोषित करतो’, असे एकाने ट्विट केले.
ट्विटरकरांच्या टीकेला निर्भिडपणे उत्तर देताना तिने लिहिले की, ‘लोक माझी खिल्ली उडवतील या भीतीमुळे मी लिहिणे थांबवणार नाही.’ सोबत तिने सलमानसोबत केलेल्या ‘जब प्यार किसेसे होता है’ चित्रपटातील फोटो शेअर करून भाईच्या चाहत्यांना नाताळाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या.