का उडाली अजयची झोप ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 10:24 IST2016-08-31T04:54:13+5:302016-08-31T10:24:13+5:30

 करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा टीझर आऊट करण्यात आला होता. हा टीझर पाहिल्यावर सर्वांनाच चित्रपटाचे कथानक, ...

Why Ajai sleep? | का उडाली अजयची झोप ?

का उडाली अजयची झोप ?

 
रण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा टीझर आऊट करण्यात आला होता. हा टीझर पाहिल्यावर सर्वांनाच चित्रपटाचे कथानक, गाणी यांची ओढ लागली आहे. चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार असून त्याचवेळी अजय देवगणचा ‘शिवाय’ ही रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान अजय म्हणाला होता की,‘ मला कुठलाही ताण नाहीये. दोन्ही चित्रपटांचे कथानक आणि प्लॉट हे वेगवेगळे आहेत.

मी ‘ऐ दिल...’ च्या टीमलाही हेच सांगितले की, बॉक्स आॅफीसवरील संघर्षाकडे लक्ष देऊ नका.’ मात्र, आता ‘ऐ दिल...’ चा टीझर पाहिल्यावर अजयची झोपच उडाली आहे. त्यानेच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला असून तो सोफ्यावर फारच अस्वस्थ होऊन झोपला आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Why Ajai sleep?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.