अरेच्चा!...कोण आहे ही हुबेहुब अनुष्का शर्मासारखी दिसणारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 19:49 IST2019-02-04T19:49:16+5:302019-02-04T19:49:34+5:30
बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. यामागचे कारण तिचा आगामी सिनेमा, अभिनय किंवा लूक नसून चक्क तिच्यासारखी हुबेहूब व्यक्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

अरेच्चा!...कोण आहे ही हुबेहुब अनुष्का शर्मासारखी दिसणारी
कलाकार नेहमी त्यांच्या अभिनय व लुक्समुळे चर्चेत येतात आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. यामागचे कारण तिचा आगामी सिनेमा, अभिनय किंवा लूक नसून चक्क तिच्यासारखी हुबेहूब व्यक्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि सध्या सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे
अनुष्काप्रमाणे दिसणारी ही तरुणी अमेरिकन नागरिक असून ज्युलिया मायकल्स असे तिचे नाव आहे. सध्या सोशल मीडियावर अनुष्का आणि ज्युलियाचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोवर कमेंट्चा पाऊस पडत आहे. ज्युलियाने इन्स्टावर तिचे काही फोटो शेअर केले असून यात ती हुबेहूब अनुष्काप्रमाणे दिसत आहे.
सोशल मीडियावर ज्युलिया आणि अनुष्काचा फोटो कोलाज केला आहे. विशेष म्हणजे हे फोटो पाहून अनेकांनी अनुष्कावर प्रश्नाचा भडीमार केला आहे. अनुष्का ही तुच आहेस का ? असे असंख्य प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावर अनुष्काला विचारले आहेत.
Nushkie @AnushkaSharma is that really you ? 🙄🙄 i really got confused but both of u are beautiful @CozIGotIssues hi julia Nice to see u here 😉 pic.twitter.com/gMfUFV1k1n
— s ᴇ ɴ💋ʀ ɪ ᴛ ᴀ (@SRKsEnorita1) February 3, 2019
दरम्यान, अनुष्काप्रमाणे दिसणारी ज्युलिया एक लेखिका असून ती गायिकाही आहे. ज्युलियाने २०१७मध्ये संगीतक्षेत्रात पदार्पण केले आहे. याच वर्षी तिचा इशूज हे सोलो सिंगर प्रदर्शित झाला आहे.