'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये गोविंदाची भूमिका साकारणार हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 12:32 IST2018-10-26T12:31:12+5:302018-10-26T12:32:20+5:30

'कुली नं १' सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात गोविंदाच्या जागी अभिनेता वरूण धवन दिसणार आहे.

who will play the role of Govinda in the remake of 'Coolie No.1' | 'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये गोविंदाची भूमिका साकारणार हा अभिनेता

'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये गोविंदाची भूमिका साकारणार हा अभिनेता

ठळक मुद्दे'कुली नं १'चा रिमेक येणार प्रेक्षकांच्या भेटीला गोविंदाची भूमिका निभावणार वरूण धवन

बॉलिवूडचा चीची म्हणजेच अभिनेता गोविंदाने त्याच्या करियरमध्ये वरूण धवनचे वडील डेविड धवन यांच्यासोबत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या दोघांच्या नंबर वन सीरिज चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली होती. या नंबर वन सीरिजपैकी 'कुली नं १' चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. आता या सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शत डेविड धवन यांना त्यांचे नंबर वन सीरिज पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणायचे आहेत. याची सुरूवात 'कुली नं १' सिनेमापासून होणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये गोविंदाच्या भूमिकेत अभिनेता वरूण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून चित्रपटाची नायिकाही लवकर फायनल करण्यात येणार आहे. 'कुली नं.१' चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यातील गाणे हिट ठरले होते आणि चित्रपटाला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच याचा रिमेक बनविण्यात येत आहे.
डेविड यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मैं तेरा हीरो' आणि 'जुडवा 2' या चित्रपटात वरूणने दमदार अभिनय साकारत यश मिळविले आहे. जुडवा 2 चित्रपट सलमान खान अभिनीत जुडवा चित्रपटाचा रिमेक होता. या सिनेमात वरूणने डबल रोल केला होता. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. सध्या वरूण यशच्या शिखरावर असून त्याच्या आतापर्यत एकही चित्रपट फ्लॉप ठरलेला नाही. त्याच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कमाई केलेली आहे. त्यामुळे 'कुली नं १'च्या रिमेकमध्ये वरूणला गोविंदाच्या भूमिकेत पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: who will play the role of Govinda in the remake of 'Coolie No.1'