अखेर कोणासोबत लग्न करणार श्रद्धा कपूर? पापा शक्ती कपूरने केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 21:43 IST2018-04-27T16:13:22+5:302018-04-27T21:43:22+5:30

बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरच्या मते, ‘माझी मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या पसंतीच्या मुलासोबतच लग्न करणार आहे. शक्ती कपूर त्यांच्या ...

Who will finally marry Shraddha Kapoor? Father Shakur Kapoor disclosed! | अखेर कोणासोबत लग्न करणार श्रद्धा कपूर? पापा शक्ती कपूरने केला खुलासा!

अखेर कोणासोबत लग्न करणार श्रद्धा कपूर? पापा शक्ती कपूरने केला खुलासा!

लिवूड अभिनेता शक्ती कपूरच्या मते, ‘माझी मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या पसंतीच्या मुलासोबतच लग्न करणार आहे. शक्ती कपूर त्यांच्या आगामी ‘द जर्नी आॅफ कर्मा’ या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीजर रिलीजप्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. श्रद्धा कपूरच्या लग्नाविषयी विचारताना शक्तीने म्हटले की, ‘प्रत्येक वडिलांची इच्छा असते की, त्यांच्या मुलीचे लग्न चांगल्या आणि सन्मानित परिवारात व्हावे. माझा तिला आशीर्वाद आहे की, तिने तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात पुढे जावे. एक वडील म्हणून मी असा विचार करतो की, आपल्या मुलांना काही स्वातंत्र्य द्यायला हवे. कारण तो काळ आता निघून गेला की, वडीलच त्यांच्या मर्जीनुसार आपल्या मुलांचे लग्न लावून देत असत. 

पुढे बोलताना शक्तीने म्हटले की, ‘आम्हाला आता त्यांच्या होणाºया जोडीदाराबरोबर प्रत्येक गोष्टीत त्यांची पसंत विचारावी लागते. सध्या ती तिच्या करिअरमध्ये प्रचंड व्यस्त आहे. जेव्हा ती तिची पसंत आम्हाला सांगणार तेव्हा त्यावर आमची कुठलीही नाराजी नसेल. उलट आमचा त्यासाठी होकारच असेल. दरम्यान, श्रद्धा सध्या भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. याविषयी शक्ती कपूरने म्हटले की, ‘मला आनंद होत आहे की, माझी मुलगी आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.’

यावेळी शक्ती कपूरने आपल्या फिल्मी प्रवासाबद्दलही सांगितले. त्यांनी म्हटले की, ‘माझा फिल्मी प्रवास खरोखरच खूप चांगला राहिला आहे. माझी मुलेही त्यांच्या आयुष्यात चांगलेच काम करीत आहेत. हे सर्व काही परमेश्वराची कृपा आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आहे. दत्त परिवाराशी सलोख्याचे संबंध असलेले शक्ती राजकुमार हिराणीच्या रणवीर कपूर अभिनित ‘संजू’ या चित्रपटाचा टीजर बघून आनंदी आहोत. याविषयी बोलताना शक्तीने म्हटले की, ‘मला असे वाटते संजूचा टीजर खूपच सुंदर आहे. आतापर्यंतचा सर्वात चांगला टीजर म्हणून यास म्हणता येईल.’ 

Web Title: Who will finally marry Shraddha Kapoor? Father Shakur Kapoor disclosed!