‘करिना-शाहीद’ की ‘आदित्य-श्रद्धा’ कोण करणार ‘सदमा’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 13:48 IST2016-04-15T08:18:54+5:302016-04-15T13:48:54+5:30

 कमल हसन आणि श्रीदेवी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाने ‘सदमा’ चित्रपट साकारला होता. लिओड बॅपिस्टा हे आता ‘सदमा’ चा रिमेक ...

Who will do 'Aditya-Shradha' of 'Kareena-Shahid', 'Shock'? | ‘करिना-शाहीद’ की ‘आदित्य-श्रद्धा’ कोण करणार ‘सदमा’?

‘करिना-शाहीद’ की ‘आदित्य-श्रद्धा’ कोण करणार ‘सदमा’?

 
मल हसन आणि श्रीदेवी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाने ‘सदमा’ चित्रपट साकारला होता. लिओड बॅपिस्टा हे आता ‘सदमा’ चा रिमेक बनवण्याच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात एन्ट्री करत आहेत.

चित्रपटासाठी टक्कल करावे लागणार म्हणून करिना कपूर खानने नकार दिला, अशा अफवा पसरल्या होत्या. बॅपिस्टा आता नव्याने दिग्दर्शन करत असल्याने तो वेगळ्या प्रकारच्या जोडींवर लक्ष केंद्रित करत आहे.

त्याला करिना-शाहीद आणि आदित्य-श्रद्धा यापैकी एका जोडीला चित्रपटात घ्यावयाचे आहे. दोन्हीही अभिनेत्री सुंदर आहेत. कुणालाही या चित्रपटासाठी घेतले तरी काहीही अडचण होणार नाही. करिनाला स्क्रिप्ट माहिती असून शाहीदसोबत तिला चित्रपट करायला काहीही हरकत नाहीये.

स्क्रिप्ट चांगली असल्याने ती हा चित्रपट करणार यात काही शंका नाही. पण, अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही की, नेमकं कोण सदमाच्या रिमेकमध्ये काम करणार आहे.

Web Title: Who will do 'Aditya-Shradha' of 'Kareena-Shahid', 'Shock'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.