जस्टीन बीबरसोबत आलेली ‘ही’ सुपरमॉडेल आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 15:18 IST2017-05-10T09:48:12+5:302017-05-10T15:18:12+5:30
23वर्षांचा ग्रॅमी विनर सिंगर जस्टीन बीबर सध्या भारतात आहे. आज रात्री मुंबईत त्याचा लाईव्ह शो रंगणार आहे. जस्टीन ऐकण्यासाठी ...

जस्टीन बीबरसोबत आलेली ‘ही’ सुपरमॉडेल आहे तरी कोण?
23 र्षांचा ग्रॅमी विनर सिंगर जस्टीन बीबर सध्या भारतात आहे. आज रात्री मुंबईत त्याचा लाईव्ह शो रंगणार आहे. जस्टीन ऐकण्यासाठी अख्खी मुंबई अधीर आहे. तरूणाई बेधूंद झाली आहे. या भारत दौ-यावर जस्टीनसोबत त्याची आई असेल, अशी बातमी मध्यंतरी आली होती. पण नाही, आई नाही तर भारतीय वंशाची ब्रिटीश सुपरमॉडल नीलम गिल जस्टीनसोबत आहे. जस्टीनसोबत नीलम तिच्या मनमोहक अदांजी प्रेक्षकांना घायाळ करणार आहे.
![]()
नीलम गिल ही एक भारतीय वंशाची सुपरमॉडेल आहे. २०१३ मध्ये Burberry campaign स्पर्धेत तिने भाग घेतला. यंदा नीलमला L’Oreal Paris UKची ब्रांड अॅम्बेसिडर नियुक्त करण्यात आले आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली नीलम मॉडेलिंग जगतातील एक मोठे नाव आहे.
वयाच्या १४ व्या वर्षी तिने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. जस्टीनसोबत नीलमही भारतात पाहुणी आहे. नीलम बॉलिवूडची खूप मोठी चाहती आहे. हृतिक रोशन तिचा सगळ्यांत आवडता हिरो.
जस्टीनच्या लाईव्ह शोची तयारी पूर्ण झाली आहे. या शोचे सगळ्यांत स्वस्त तिकिट ४००० रुपए आहे. याशिवाय २५ हजार डायमंड, १५ हजार प्लॅटिनम, १० हजार रुपए गोल्ड आणि ७ हजार रुपए सिल्व्हर तिकिटासाठी मोजावे लागणार आहेत. बीबरला लाईव्ह पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपºयातून सुमारे ४५ हजार प्रेक्षक येणार आहेत. या शोमध्ये जस्टीन व त्याची २५ डान्सरची टीम पहिले ९० मिनिट परफॉर्म करणार आहे. आता त्याचा हा शो कसा रंगतो, ते आपण काहीच तासांत बघणार आहोत. लवकरच आपली ही प्रतीक्षा संपणार आहे.