"हे काका कोण आहेत?" प्रसिद्ध अभिनेत्रीकडून शाहरुख खानचा अपमान? 'त्या' पोस्टमुळे चाहते संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:27 IST2026-01-21T16:25:27+5:302026-01-21T16:27:58+5:30

या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये त्या अवॉर्ड सोहळ्यातील एक फोटो दिसत आहे. ज्यामध्ये शाहरुखसोबत एक अभिनेत्री दिसत आहे. या फोटोमध्ये शाहरुखला उद्देशून असं म्हटलं गेलं आहे की "हे काका कोण आहेत?"

who is this uncle turkish actress hande ercel truth behind shah rukh khan post | "हे काका कोण आहेत?" प्रसिद्ध अभिनेत्रीकडून शाहरुख खानचा अपमान? 'त्या' पोस्टमुळे चाहते संतप्त

"हे काका कोण आहेत?" प्रसिद्ध अभिनेत्रीकडून शाहरुख खानचा अपमान? 'त्या' पोस्टमुळे चाहते संतप्त

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. पण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मात्र शाहरुखला ओळखत नसल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. शाहरुख खानने नुकतीच जॉय टर्किश अवॉर्डस २०२६ साठी रियाधमध्ये हजेरी लावली होती. या सोहळ्यातील त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. शाहरुख स्टेजवर असताना तुर्की अभिनेत्री हांडे एर्सेल अभिनेत्याचा व्हिडीओ शूट करताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नेटकरी हांडे एर्सेलला शाहरुखची चाहती म्हणत होते. मात्र त्यानंतर अभिनेत्रीची एक पोस्ट व्हायरल झाली ज्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये त्या अवॉर्ड सोहळ्यातील एक फोटो दिसत आहे. ज्यामध्ये शाहरुखसोबत एक अभिनेत्री दिसत आहे. या फोटोमध्ये शाहरुखला उद्देशून असं म्हटलं गेलं आहे की "हे काका कोण आहेत? मी फक्त माझ्या मैत्रिणीचा व्हिडीओ काढत होते. मी याची चाहती नाही. कृपया चुकीची माहिती पसरवू नका". अभिनेत्रीने शाहरुखचा काका म्हणून उल्लेख केल्याने तिला ट्रोल केलं जात आहे. 

हांडे एर्सेलने शाहरुखला खरंच काका म्हटलं? 

शाहरुख खानला काका म्हणत व्हायरल झालेल्या फोटोवर अभिनेत्री हांडे एर्सेल हिने प्रतिक्रिया दिली आहे. तो फोटो फेक असून मी अशा पद्धतीची पोस्ट केली नसल्याचं तिने म्हटलं आहे. याशिवाय शाहरुख खानला काका म्हटलं नसल्याचं स्पष्टीकरणही अभिनेत्रीने दिलं आहे. 

Web Title : अभिनेत्री द्वारा शाहरुख खान का 'अपमान'? वायरल पोस्ट से आक्रोश।

Web Summary : एक वायरल पोस्ट में झूठा दावा किया गया है कि अभिनेत्री हांडे एर्सेल ने शाहरुख खान को 'अंकल' कहा, जिससे आक्रोश फैल गया। एर्सेल ने स्पष्ट किया कि पोस्ट फर्जी थी और उन्होंने कभी ऐसा बयान नहीं दिया। मूल वीडियो में उन्हें एक पुरस्कार समारोह में खान की शूटिंग करते हुए दिखाया गया था।

Web Title : Shah Rukh Khan 'insulted' by actress? Viral post sparks outrage.

Web Summary : A viral post falsely claims actress Hande Erçel called Shah Rukh Khan 'uncle,' sparking outrage. Erçel clarified the post was fake and she never made the statement. The original video showed her filming Khan at an awards show.