Jessica Hines: कोण आहे जेसिका हाइन्स? जिच्यासोबत होतं आमिर खानचं अफेयर, एक मुलगादेखील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:19 IST2025-08-19T18:19:34+5:302025-08-19T18:19:58+5:30

Aamir Khan : आमिर खान सध्या चर्चेत आहे. खरंतर, त्याच्या भावाने असा खुलासा केला आहे की त्याचे एका ब्रिटिश पत्रकाराशी प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्यापासून एक मूल देखील आहे.

Who is Jessica Hines? The woman with whom Aamir Khan had an affair and also has a son? | Jessica Hines: कोण आहे जेसिका हाइन्स? जिच्यासोबत होतं आमिर खानचं अफेयर, एक मुलगादेखील

Jessica Hines: कोण आहे जेसिका हाइन्स? जिच्यासोबत होतं आमिर खानचं अफेयर, एक मुलगादेखील

Who is Jessica Hines:आमिर खान(Aamir Khan)चा भाऊ फैसल खान(Faisal Khan)ने नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली जिथे त्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी सार्वजनिकरित्या संबंध तोडले. अनेक धक्कादायक खुलाशांमध्ये, एक्स अभिनेत्याने असेही सांगितले की, त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर, आमिर खानचे जेसिका हाइन्स नावाच्या महिलेशी अफेयर होते आणि त्या दोघांना एक लग्नाशिवाय मुलगा देखील होता.

स्टारडस्ट मासिकाने लगान अभिनेत्याच्या कथित प्रेमसंबंधाचा खुलासा केल्यानंतर जवळजवळ २० वर्षांनी हे आरोप पुन्हा समोर आले आहेत. त्याच्या भावाच्या पुष्टीनंतर, सोशल मीडियावर आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊया ही जेसिका हाइन्स कोण आहे?

कोण आहे जेसिका हाइन्स?
जेसिका हाइन्स ही एक ब्रिटिश पत्रकार आहे. ती १९९८ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर एक पुस्तक लिहिण्यासाठी भारतात आली होती. याच काळात तिची भेट आमिर खानशी झाली, जो त्यावेळी 'गुलाम' चित्रपटाचे शूटिंग करत होता. २००७ मध्ये जेसिकाचे प्रसिद्ध पुस्तक 'लुकिंग फॉर द बिग बी' लाँच झाले. या पुस्तकामुळे ती भारतात राहिली आणि आमिर खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सशी तिचे चांगले संबंध निर्माण झाले. २००७ मध्ये तिने लंडनमधील एका व्यावसायिकाशी लग्न केले आणि भारतीय स्टार्सपासून स्वतःला दूर केले.

आमिरला जेसिकापासून आहे एक मूलगा?
२००५ मध्ये आमिर खान त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादात अडकला होता. स्टारडस्ट मासिकाने एका लेखाद्वारे आमिरचे ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्सशी प्रेमसंबंध असल्याचा खुलासा केला होता. इतकेच नाही तर त्याच लेखात असा दावाही करण्यात आला होता की जेसिका आणि आमिरला एक मुलगा देखील आहे, ज्याला आमिरने कधीही स्वीकारला नाही. अशा अफवांनी खळबळ उडाली असली तरी आमिरने या सर्व गोष्टी नाकारल्या आहेत.

जेसिकाला आमिर खानने सांगितलेलं अबॉर्शन करायला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान जेसिका हाइन्ससोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर जेसिका प्रेग्नेंट राहिल्याचे सांगितले जाते आणि तिने अभिनेत्याला सांगितल्यानंतर त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले होते. पण जेसिकाने तिच्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने 'जान' ठेवले. त्यानंतर जेसिकाने लंडनमधील व्यावसायिक विल्यम टॅलबोटशी लग्न केले. टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, जेसिकाने खुलासा केला की, मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या पुस्तकावर काम करत असताना तिचा पती विल्यम तिच्या मुलाची काळजी घेत होता.

Web Title: Who is Jessica Hines? The woman with whom Aamir Khan had an affair and also has a son?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.