कोणी नाकारला आमिरकडून ‘शादी का जोडा’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 14:37 IST2016-11-22T14:35:20+5:302016-11-22T14:37:04+5:30

होय..तुम्ही वाचताय ते अगदी खरंय.. ‘कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट’ गीता फोगट हिने आमिर खानने गिफ्ट म्हणून देऊ केलेला ‘ शादी ...

Who has rejected Aamir's 'Why marriage?' | कोणी नाकारला आमिरकडून ‘शादी का जोडा’?

कोणी नाकारला आमिरकडून ‘शादी का जोडा’?

य..तुम्ही वाचताय ते अगदी खरंय.. ‘कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट’ गीता फोगट हिने आमिर खानने गिफ्ट म्हणून देऊ केलेला ‘शादी का जोडा’ चक्क परत केला? तिने असे का केले? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात डोकावतील. दोन दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान तिला लग्नाचे गिफ्ट म्हणून ‘शादी का जोडा’ देणार होता. मात्र, ‘जोडा’ नाकारण्यातही तेवढेच तथ्य आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून आमिर खान पहेलवान महावीर फोगटच्या सान्निध्यात होता. त्यामुळे त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांच्यासोबतची त्याची जवळीक ही साहजिकच वाढली होती. त्या दोघींचे आॅनस्क्रीन वडील म्हणून आमिर खान चाखरी दादरीच्या ‘बालाजी व्हिलेज’ येथे काल लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होता. ठरल्याप्रमाणे आमिर त्याचे ‘गिफ्ट’ घेऊन तिथे गेला असता गीताने ते गिफ्ट घेण्यास नकार दिला. याविषयी बोलताना तो म्हणाला,‘मला गीताला शादी का जोडा गिफ्ट करायचा होता. पण, प्रथापरंपरेनुसार तशी परवानगी नाही. फक्त वधूचा मामा हा शादीचा जोडा वधूला देऊ शकतो. त्यामुळे मी तिला दुसरे गिफ्टस आॅफर केले.’ 

आमिर खान बॉलिवूडचा ‘मि.परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. गीताच्या लग्नावेळी त्याने देऊ केलेला ‘शादी का जोडा’ नाकारल्याने आमिरची पंचाईत झाली खरी. मात्र, त्याने तिला इतर गिफ्टस देऊन स्वत:चे परफेक्शन दाखवून दिले असेच म्हणावे लागेल.

Web Title: Who has rejected Aamir's 'Why marriage?'