कुणाच्या प्रेमात पडला करणसिंग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 10:02 IST2016-08-25T04:32:08+5:302016-08-25T10:02:08+5:30

काही महिन्यांपूर्वीच तर बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हरचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. दोघेही जण नेहमी कुठे आऊटिंग, हँगआऊट, ...

Who has fallen in love with someone? | कुणाच्या प्रेमात पडला करणसिंग ?

कुणाच्या प्रेमात पडला करणसिंग ?

ही महिन्यांपूर्वीच तर बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हरचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. दोघेही जण नेहमी कुठे आऊटिंग, हँगआऊट, आणि व्हॅकेशन्सवर जात असतात. पण, हे अचानक असे काय झाले की करणसिंग कोणाच्या तरी प्रेमात पडला.

अहो..थांबा थांबा.. तुम्ही दुसरा विचार करण्याअगोदर हे सांगणे गरजेचे आहे की, करणसिंग कलेच्या प्रेमात पडला आहे. त्याला नेहमीच हातात ब्रश घेऊन पेंट करायला खुप आवडते.

बिप्सने हाच त्याचा चित्र रेखाटतांनाचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला आहे. तो अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्र रेखाटतो आहे. बिप्सने या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ इमर्स इन द लव्ह आॅफ आर्ट - माय आर्टिस्ट अ‍ॅट वर्क बिग बँग इन द मेकिंग.’

karan singh grover

Web Title: Who has fallen in love with someone?