​‘जुडवा २’मध्ये अखेर वरुणसोबत असणार तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 12:05 IST2016-11-22T10:37:29+5:302016-11-22T12:05:40+5:30

चित्रपटाची जेव्हा घोषणा करण्यात येते तेव्हा लगेच स्टारकास्टसुद्धा घोषित केले जाते. वरुण धवन स्टारर ‘जुडवा २’ची अधिकृत घोषणा होऊन ...

Who is going to be with Varun in 'Twilight 2'? | ​‘जुडवा २’मध्ये अखेर वरुणसोबत असणार तरी कोण?

​‘जुडवा २’मध्ये अखेर वरुणसोबत असणार तरी कोण?

त्रपटाची जेव्हा घोषणा करण्यात येते तेव्हा लगेच स्टारकास्टसुद्धा घोषित केले जाते. वरुण धवन स्टारर ‘जुडवा २’ची अधिकृत घोषणा होऊन अनेक महिने उलटून गेले तरी यामध्ये हीरोईन कोण असणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

निर्मात्यांना वरुणसाठी हीरोईन शोधण्यात एवढा वेळ का लागत आहे? हाच खर मुद्दा आहे.

चित्रपटात दोन अभिनेत्रींची गरज आहे. त्यासाठी आलिया आणि श्रद्धा कपूर यांची नावे चर्चेत होती. मग जॅकलिन आणि परिणीती चोप्रा रडारवर आले. ‘ढिशूम’मध्ये या दोघी त्याच्यासोबत झळकल्या होत्या. मध्यंतरी ‘मैं तेरा हीरो’ को-स्टार इलियाना डीक्रुजचाही विचार झाला; परंतु तिने नकार दिल्याने निर्मात्यांचा भ्रमनिरास झाला.

आता या लिस्टमध्ये ‘पिंक’ फेम तापसी पन्नूची भर पडली आहे. सुत्रांनुसार ‘जुडवा २’मध्ये जॅकलिन आणि तापसी पन्नूसोबत वरुण रोमान्स करताना दिसेल. विशेष म्हणजे वरुणचे वडिल डेव्हिड धवन यांनीच तापसीला ‘चष्मे बद्दूर’द्वारे बॉलीवूडमध्ये ब्रेक दिला होता.


जुडवा २ : जॅकलिन फर्नांडिज, वरुण धवन, तापसी पन्नू

आता बघुया ही स्टारकास्ट तरी फायनल होते का. सलमान खानच्या ‘जुडवा’ (१९९७) सिनेमाचा हा सिक्वेल असून डेव्हिड यांनी तो दिग्दर्शित केला होता. यामध्ये सलमानसोबत करिश्मा कपूर आणि रंभा या दोन अ‍ॅक्ट्रेस होत्या. त्या काळी बॉक्स आॅफिसवर जबरदस्त हीट ठरलेल्या या सिनेमाच्या सिक्वेलची अनेक दिवसांपासून चर्चा होती.

cnxoldfiles/a> हीरो मिळत नाहीए.

Web Title: Who is going to be with Varun in 'Twilight 2'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.