ब्रेकअपची चर्चा ताजी असतानाच, गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी रणबीर कपूर लंडनला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 04:40 AM2018-03-30T04:40:44+5:302018-03-30T10:11:29+5:30

रणबीर कपूर नेहमीच आपल्या अफेयर्सना घेऊन चर्चेत असतो. सध्या रणबीर आणि आलियाच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती. मात्र या ...

While Brechy's talk was fresh, Ranbir Kapoor, left for London, to meet girlfriends | ब्रेकअपची चर्चा ताजी असतानाच, गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी रणबीर कपूर लंडनला रवाना

ब्रेकअपची चर्चा ताजी असतानाच, गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी रणबीर कपूर लंडनला रवाना

googlenewsNext
बीर कपूर नेहमीच आपल्या अफेयर्सना घेऊन चर्चेत असतो. सध्या रणबीर आणि आलियाच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती. मात्र या लव्हस्टोरीमध्ये आता एक नवा ट्वीस्ट आला आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार रणबीर सध्या आल्या मैत्रिणीला भेटायला लंडनला गेला आहे. तुम्हाल अंदाज आला असेलच आम्ही रणबीरच्या कोणत्या मैत्रिणीबदल बोलत आहोत ते. रणबीर माहिरा खानला भेटण्यासाठी लंडनला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून माहिरा आणि रणबीर लंडनमध्ये क्लॉलिटी टाईम स्पेंट करतायेत. पुन्हा एकदा माहिराचा स्मोकिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर ती  पुन्हा वादात सापडली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार सध्या रणबीरने आपला आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग बल्गेरियामध्ये पूर्ण करुन थेट लंडन गाठले आहे. माहिरा लंडनमध्ये आपला आगामी चित्रपट 'वरना'चे प्रमोशन करण्यासाठी आला होती. सध्या माहिरा पाकिस्तानाला परत गेली आहे तर रणबीर आपल्या कामाला लागला आहे. याआधही माहिरा आणि रणबीरला एकत्र पाहण्यात आला आहे. माहिरा व रणबीरचे एकत्र स्मोकिंग करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंनी खळबळ उडवून दिली होती. या फोटोनंतर रणबीर व माहिरा दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी चर्चा सुरु झाली होती. माहिराने शाहरुख खानच्या 'रसई' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  

ALSO READ :  OMG ! ​पुन्हा एकदा स्मोकिंग करताना दिसली माहिरा खान!!

सध्या रणबीर कपूर लंडनमध्ये मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग घेतो आहे. ब्रम्ह्रास्त्र रणबीर कपूर आपल्याला जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.  अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे. 

Web Title: While Brechy's talk was fresh, Ranbir Kapoor, left for London, to meet girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.