​‘रिअल अ‍ॅण्ड रिल लाईफ’ मुलींसोबत कुठे पोहोचला आमीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 12:06 IST2016-10-25T12:03:54+5:302016-10-25T12:06:09+5:30

होय, आमीर सध्या आपल्या ‘रिअल अ‍ॅण्ड रिल लाईफ’ मुलींसोबत फिरतो आहे. आमीरची रिअल लाईफ मुलगी कोण, हे तर तुम्ही ...

Where is the real and true life 'Aamir' with the girls? | ​‘रिअल अ‍ॅण्ड रिल लाईफ’ मुलींसोबत कुठे पोहोचला आमीर?

​‘रिअल अ‍ॅण्ड रिल लाईफ’ मुलींसोबत कुठे पोहोचला आमीर?

य, आमीर सध्या आपल्या ‘रिअल अ‍ॅण्ड रिल लाईफ’ मुलींसोबत फिरतो आहे. आमीरची रिअल लाईफ मुलगी कोण, हे तर तुम्ही जाणताच. ती म्हणजे इरा खान. आता रिल लाईफ मुलींबद्दल सांगायचे तर फातिमा सना खान आणि सान्या मल्होत्रा. होय, ‘दंगल’ या आगामी चित्रपटात फातिमा आणि सान्या या दोघींनी आमीरच्या मुलींची भूमिका साकारली आहे. ‘मामि’ चित्रपट महोत्सवात आमीर फातिमा, सान्या आणि इरा या तिघींसोबत पोहोचला.  इरा खान ही आमीर आणि त्याची पहिली पत्नी गीता यांची मुलगी आहे. यापूर्वीही आमीर अनेकदा इरासोबत दिसला.  



 यावर्षी आमीर दोनदा ‘मामि’ मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये सामील झाला. एकदा ‘दंगल’च्या निमित्ताने आणि दुस-यांदा ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण झाल्याच्या सेलिब्रेशनमध्ये आमीर ‘मामि’ महोत्सवात सामील झाला.‘मामि’ चित्रपट महोत्सवाला गेल्या गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. अनेक गाजलेले   ५४ देशांतील १८० चित्रपट या महोत्सवातून दाखवले जाणार आहेत. 
‘दंगल’ हा बायोपिक कुस्तीपटू महावीर फोगाट आणि त्यांच्या मुली गीता व बबिता फोगाट यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे. गत आठवड्यात या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आणि लोकांनी ते डोक्यावर घेतले. खुद्द आमीर, किरण राव आणि सिद्धार्थ राय कपूर निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षाच्या अखेरिस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत, हे वेगळे सांगायला नकोच.

 
 

Web Title: Where is the real and true life 'Aamir' with the girls?