अनुष्का शर्मा लेकीसोबत गेली या ठिकाणी, इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 16:38 IST2021-03-03T16:37:41+5:302021-03-03T16:38:29+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या घरी जानेवारीत एका चिमुकलीचे आगमन झाले आहे

This is where Anushka Sharma went with daughter, a photo shared on Instagram Story | अनुष्का शर्मा लेकीसोबत गेली या ठिकाणी, इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला फोटो

अनुष्का शर्मा लेकीसोबत गेली या ठिकाणी, इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला फोटो

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या घरी जानेवारीत एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. अनुष्का आणि विराटच्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे. त्या दोघांनी त्यांच्या मुलीच्या जन्माची बातमी चाहत्यांना दिली असली तरी त्यांनी मुलीला मीडियापासून दूर ठेवले आहे.

आई झाल्यानंतर अनुष्का पहिल्यांदा घराबाहेर पडली आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला नुकताच एक फोटो शेअर केला आहे. सुर्योदयाच्या या फोटोमध्ये शहर आणि शहराला लागून असलेली नदी दिसते आहे. यावर अनुष्काने गुड मॉर्निंग लिहिले आहे. हा फोटो पाहुन अनुष्का नेमकी कुठे गेली आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र अनुष्का भारतातच असून अहमदाबादमधील फोटो तिने शेअर केलाय.

अहमदाबाद इथे नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली सध्या अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. नेहमीप्रमाणे विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का वामिकाला घेऊन अहमदाबादला पोहचली आहे. साबरमती नदी काठच्या एका हॉटेलमध्ये ती थांबली असून या हॉटेलच्या खिडकीतून काढलेला फोटो अनुष्काने शेअर केला आहे. याआधी देखील अनेक सामन्यांमध्ये अनुष्का विराटला सपोर्ट करताना दिसून आली आहे.


इंग्लंडचे माजी क्रिकेटर मार्क निकोलस यांच्या ‘नॉट जस्ट क्रिकेट’ पॉडकास्टवर विराटने अनुष्काचे कौतुक केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, यात अनुष्का माझी आधारस्तंभ आहे. अनुष्काला स्वत:ला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तिला टीकेला समोरे जावे लागले आहे. त्यामुळे ती माझ्या भावना समजू शकते आणि मी तिच्या.


काही दिवसांपूर्वी अनुष्काने तिघांचा फोटो पोस्ट केला आणि तिने लेकीचे नाव वामिका असे ठेवल्याचे जाहीर केले. लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो शानदार बनवण्यासाठी अनुष्काने स्पेशल कॅप्शनही लिहिले. तिने लिहिले होते की,''आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकाने आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणे, हसणे, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेले प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे.''

Web Title: This is where Anushka Sharma went with daughter, a photo shared on Instagram Story