'जग बदलून जातं जेव्हा...', अंकिता लोखंडेनं शेअर केला विकी जैनसोबतचा रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 11:47 IST2021-05-03T11:46:52+5:302021-05-03T11:47:27+5:30

अंकिताने नुकतेच सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होत आहे.

'When the world changes ...', Ankita Lokhande shares a romantic photo with Vicky Jain | 'जग बदलून जातं जेव्हा...', अंकिता लोखंडेनं शेअर केला विकी जैनसोबतचा रोमँटिक फोटो

'जग बदलून जातं जेव्हा...', अंकिता लोखंडेनं शेअर केला विकी जैनसोबतचा रोमँटिक फोटो

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती लव्ह लाइफमुळे नेहमी चर्चेत येत असते. अंकिताने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिता बॉयफ्रेंड विकी जैनवरील प्रेम बिनधास्तपणे व्यक्त करत असते. अंकिताने नुकतेच सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होत आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.


लॉकडाउन दरम्यान विकी जैनने अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत क्वॉलिटी टाइम व्यतित करताना दिसत आहे. फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, जग बदलून जाते जेव्हा नजरानजर होते.

फोटोमध्ये पहायला मिळतंय की ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात पहात आहेत. त्यांच्या समोर टेबलावर केक आणि कँडल ठेवलेली आहे. दुसऱ्या फोटोत ते दोघे पोझ देताना दिसत आहेत. या फोटोला खूप पसंती मिळते आहे.

या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. एका युजरने लिहिले की बेस्ट कपल, दुसऱ्या युजरने म्हटले की, कमाल जोडी याशिवाय बरेच कमेंट्स तिच्या फोटोवर होत आहे.


अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या रिलेशनशीपला नुकतेच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ते दोघे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत सुशांत सिंग राजपूत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. या मालिकेशिवाय अंकिता मणिकर्णिका आणि बागी ३ मध्ये पहायला मिळाली होती.

Web Title: 'When the world changes ...', Ankita Lokhande shares a romantic photo with Vicky Jain