नीसा देवगण कधी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? वडील अजय देवगणनं सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:23 IST2025-05-29T16:22:42+5:302025-05-29T16:23:37+5:30
Nyasa Devgan : अभिनेत्री काजोलचा सिनेमा 'माँ'चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी अजय देवगणने नीसा देवगणच्या पदार्पणाबद्दल खुलासा केला.

नीसा देवगण कधी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? वडील अजय देवगणनं सोडलं मौन
अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिनेता अजय देवगण(Ajay Devgan)ची मुलगी नीसा(Nyasa Devgan)ने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नाही, तरीही ती सतत चर्चेत येत असते. नीसाचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. इतर कोणत्याही स्टारपेक्षा जास्त लोक न्यासाला फॉलो करतात. चाहते न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता वडील अजय देवगण यांनी नीसाच्या पदार्पणाबाबत मौन सोडले आहे.
काजोलच्या 'माँ' या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच झाला. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण यांनी केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये काजोल आणि अजय यांनी खूप धमालमस्ती केली आणि मुलगी नीसाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. जेव्हा माँ सिनेमात नीसाला घेण्याचा विचार केला होता का असे विचारण्यात आले तेव्हा अजय देवगण म्हणाला की, सध्यातरी तिला सिनेमात काम करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. यावेळी अजय देवगणने स्पष्टच सांगितले की, नीसाला आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आता पाहावे लागेल की, भविष्यात बॉलिवूडमध्ये काम करताना दिसेल की नाही.
'माँ' सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी काजोलला सपोर्ट करण्यासाठी तिचा मुलगा युग देवगण हजर होतो. तो त्याच्या आईसोबत दिसला. ट्रेलर लाँचवेळी काजोल काळ्या रंगाच्या साडीत दिसली.
'माँ' सिनेमाबद्दल
काजोलच्या 'माँ' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक पौराणिक-भयपट आहे. ज्यामध्ये काजोल तिच्या मुलीला राक्षसांपासून वाचवताना दिसते. हा ट्रेलर खूपच भयानक आहे. चित्रपटात एका झपाटलेल्या झाडाची आणि घनदाट जंगलाची कहाणी दाखवण्यात आली आहे. ट्रेलर खूपच रंजक आहे. आता हा चित्रपट चाहत्यांची मने किती जिंकतो हे पाहावे लागेल. काजोलचा 'माँ' हा चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.