'मुन्नाभाई ३' कधी रिलीज होणार? संजय दत्तने दिलं हे खास उत्तर अन् चाहत्यांना केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:59 IST2024-10-24T13:58:16+5:302024-10-24T13:59:06+5:30

'मुन्नाभाई ३' बद्दल संजय दत्तने सर्वांना हे खास उत्तर दिलंय. याशिवाय चाहत्यांना सिनेमाच्या रिलीजविषयी मोठी अपडेट दिलीय (munnabhai 3)

When will Munnabhai 3 movie release Sanjay Dutt gave this special answer and requested rajkumar hirani | 'मुन्नाभाई ३' कधी रिलीज होणार? संजय दत्तने दिलं हे खास उत्तर अन् चाहत्यांना केली विनंती

'मुन्नाभाई ३' कधी रिलीज होणार? संजय दत्तने दिलं हे खास उत्तर अन् चाहत्यांना केली विनंती

'मुन्नाभाई' या सिनेमाची सगळीकडे जबरदस्त क्रेझ आहे. 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी खास पसंती दिली. दोन्हीही सिनेने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. गेल्या काही दिवसांपासून 'मुन्नाभाई'चा तिसरा भाग अर्थात 'मुन्नाभाई ३'ची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. 'मुन्नाभाई'चे खास चाहते सिनेमाचा तिसरा भाग कधी रिलीज होणार, याची वाट पाहत आहेत. अशातच 'मुन्नाभाई ३'विषयी स्वतः संजय दत्तने मोठी अपडेट दिलीय. 

'मुन्नाभाई ३'बद्दल संजय दत्त काय म्हणाला?

'मुन्नाभाई ३' बद्दल संजय दत्तने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं. संजय दत्त म्हणाला, "'मुन्नाभाई ३' कधी रिलीज होणार याबद्दल मला विचारण्यापेक्षा तुम्हीच राजकुमार हिरानींना विचारा. मी राजकुमार हिरानींना हा प्रश्न विचारुन विचारुन थकलोय की, माझं आवडतं कॅरेक्टर मुन्नाभाई पुन्हा परत कधी येणार." अशाप्रकारे संजय दत्तने 'मुन्नाभाई ३'बद्दल मोठी अपडेट दिलीय. त्यामुळे 'मुन्नाभाई ३' कधी येणार याविषयी सर्वस्वी निर्णय राजकुमार हिरानींचा असेल, हेच यावरुन स्पष्ट दिसतंय.

संजय दत्तचं वर्कफ्रंट

संजय दत्त वयाच्या ६५ व्या वर्षी सध्या विविध सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. संजय दत्त सध्या बॉलिवूड नव्हे तर साऊथ सिनेमांमध्येही सध्या चांगलाच सक्रीय आहे. 'लिओ', 'आयस्मार्ट शंकर' अशा सिनेमांमध्ये संजय दत्त झळकला होता. संजय दत्त आता आगामी 'राजासाब', 'केडी-द डेव्हिल', 'विदामुयर्ची' अशा सिनेमांमध्ये काम करणार आहे. एकूणच सध्या बॉलिवूडपेक्षा साऊथ सिनेमांमध्ये संजूबाबाची चलती आहे. 

Web Title: When will Munnabhai 3 movie release Sanjay Dutt gave this special answer and requested rajkumar hirani