करिअरच्या सुरुवातीला मुलींसारखा दिसतो म्हणून हिणवले गेले,आज तोच बनलाय बॉलीवुडचा एक्शन हिरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 14:18 IST2021-03-06T14:13:33+5:302021-03-06T14:18:03+5:30

डान्समध्ये ह्रतिक रोशनला कुणी टक्कर देत असेन तर तो फक्त टायगरच देऊ शकतो. फॅन्स टायगरच्या डान्सिंगवर फिदा आहेत.

When Tiger Shroff cried a lot Of people made fun of His name and looks | करिअरच्या सुरुवातीला मुलींसारखा दिसतो म्हणून हिणवले गेले,आज तोच बनलाय बॉलीवुडचा एक्शन हिरो

करिअरच्या सुरुवातीला मुलींसारखा दिसतो म्हणून हिणवले गेले,आज तोच बनलाय बॉलीवुडचा एक्शन हिरो

बॉलीवुडचा अॅक्शन हिरो म्हणून अभिनेता टायगर श्रॉफने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. टायगर केवळ फायटिंगच चांगली करतो असं नाही तर तो एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. डान्समध्ये ह्रतिक रोशनला कुणी टक्कर देत असेन तर तो फक्त टायगरच देऊ शकतो. फॅन्स टायगरच्या डान्सिंगवर फिदा आहेत. टायगर सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह असतो. स्वतःचे डान्स व्हिडीओ तो सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करतो. 

डान्स करताना टायगरमधली ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. 'बागी' आणि 'बागी-२' मध्ये अभिनय, एक्शन आणि डान्सचा जलवा पाहून सारेच घायाळ झाले होते. या सिनेमातून तरुणाईला घायाळ करण्यासाठी तसंच रसिकांची मने जिंकण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. 

मात्र सुरुवातीच्या काळात टायगर श्रॉफला रसिकांचे प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. करिअरच्या सुरुवातीला टायगरचा लूक हिरोला साजेसा नव्हता. त्यामुळे त्याच्या लूकवरुन त्याला अनेकदा खिल्लीही उडवली जायची. जास्तच गोरा आणि चेहऱ्यावर दाढी-मिशा नसल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर थट्टा केली जात होती. काही लोकांनी तर टायगर श्रॉफची तुलना करिना कपूर सोबतही केली होती.

 

सोशल मीडियावर करिना आणि टायगर या दोघांचे फोटो क्लब करून शेअर करणे लोकांनी सुरु केले होते. तर अनेकदा त्याला ‘मुलींसारखा दिसतो’ असे म्हटले जायचे. या कमेंटनंतर टायगर श्रॉफला खूप वाईटही वाटायचे. अक्षरश तो या गोष्टीमुळे दुखावल्याने त्याला रडूही कोसळले होते.  अशी माहिती त्याने स्वत:च दिली होती. 

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगतात. मात्र याविषयी कधीच दोघांनी प्रत्यक्ष कबुली दिली नसली तरीही काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी मालदीवला गेले होते. दोघांनी मालदिवचे फोटो शेअर केले होते. मात्र, तेव्हादेखील दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नव्हते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे दोघेही प्रेमात असल्याचे संकेत दोघांनीच चाहत्यांना दिले आहेत.

Web Title: When Tiger Shroff cried a lot Of people made fun of His name and looks