VIDEO: ‘माझे अजय देवगणवर प्रेम आहे...’, काजोलच्या या वाक्यावर काय होती आई तनुजाची रिअ‍ॅक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 17:22 IST2020-07-19T17:20:32+5:302020-07-19T17:22:55+5:30

काजोल, अजय, तनुजा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

when tanuja revealed how kajol broke the news that she was in love with ajay devgn | VIDEO: ‘माझे अजय देवगणवर प्रेम आहे...’, काजोलच्या या वाक्यावर काय होती आई तनुजाची रिअ‍ॅक्शन?

VIDEO: ‘माझे अजय देवगणवर प्रेम आहे...’, काजोलच्या या वाक्यावर काय होती आई तनुजाची रिअ‍ॅक्शन?

ठळक मुद्देकाजोल व अजयच्या लग्नानंतरचा एक किस्साही तनुजा यांनी शेअर केला.

अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडचे बेस्ट कपल आहे. दोघांच्याही लग्नाला 21 वर्षे झाली आहेत. अजय व काजोलची लव्हस्टोरी तुम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र काजोलने पहिल्यांदा आईजवळ या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा तनुजा यांची रिअ‍ॅक्शन काय होती, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. सध्या काजोल, अजय, तनुजा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत रवीना टंडन काजोल, अजय, तनुजा यांच्याशी बोलताना दिसतेय. अजय व काजोलच्या लव्हस्टोरीबद्दल ती तनुजा यांना विचारतेय. काजोलने पहिल्यांदा अजयबद्दल सांगितले, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती, असा प्रश्न रवीना तनुजा यांना करते.

यावर तनुजा सांगतात, काजोल एकदिवस माझ्याजवळ आली आणि मी प्रेमात पडलीय, असे मला म्हणाली. यावर ठीक आहे, मुलगा कोण आहे,? असा प्रश्न मी तिला केला. पण काजोलने नाव सांगण्याआधी त्याच्या डोळ्यांचे कौतुक सुरु केले. आई तू त्यांचे डोळे पाहायला हवेत, असे ती मला म्हणाली. नाव काय, असे विचारल्यावर तिने अजय देवगणचे नाव घेतले. ते नाव ऐकल्यावर पुढे मी काहीच बोलली नाही. मी एकदम शांत झाले.

काजोल व अजयच्या लग्नानंतरचा एक किस्साही तनुजा यांनी शेअर केला. त्यांनी सांगितले, काजोल व अजयचे लग्न होऊन 2 वर्षे झाली होती. पण तोपर्यंतही आई, सासूमाँ वा तनुजा असे काहीच म्हटले नव्हते. एकदिवस मी त्याला बोलावले अन् काजोलशी बोलायचे तर तुला मला आधी आई, सासू माँ किंवा तनुजाजी यापैकी एका नावाने बोलवावे लागेल, असे त्याला म्हणाले. यानंतर मात्र अजय मोकळेपणाने माझ्यासोबत बोलू लागला.

Web Title: when tanuja revealed how kajol broke the news that she was in love with ajay devgn

टॅग्स :Kajolकाजोल