जेव्हा शिल्पा शेट्टी रिक्षाने प्रवास करते, फोटो शेअर करत व्यक्त केला सुखद प्रवासाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:06 IST2019-01-19T17:02:23+5:302019-01-19T17:06:48+5:30

या फोटोंमुळे ग्लॅमरस आयुष्य जगणारी शिल्पा शेट्टीही सामान्य आयुष्य जगणे पसंत करते हे अधोरेखित झाले आहे. 

When Shilpa Shetty travels by Auto Rickshaw , she expresses her happy journey experience | जेव्हा शिल्पा शेट्टी रिक्षाने प्रवास करते, फोटो शेअर करत व्यक्त केला सुखद प्रवासाचा अनुभव

जेव्हा शिल्पा शेट्टी रिक्षाने प्रवास करते, फोटो शेअर करत व्यक्त केला सुखद प्रवासाचा अनुभव

सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसुद्धा कधी कधी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अनेकवेळा  शुटिंग स्थळी पोहचण्यासाठी अनेकदा कलाकार मंडळी  कधी मेट्रो तर कधी ट्रेनने प्रवास करत असल्याचे पाहायला मिळते. अगदी   
अशाच प्रकारे शिल्पा शेट्टीलाही असाच एक वेगळा प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले. शिल्पाने यावेळी ट्रेन नाही, मेट्रो नाही, बस नाही तर चक्क  रिक्षाने प्रवास करताना पाहायला मिळाले आहे. शिल्पा शेट्टी रिक्षाने फिरत असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विशेष म्हणजे तब्बल 15 वर्षानंतर शिल्पाने रिक्षाने फिरण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी ती एकटीच नसून तिच्या  फ्रेंडसोबत मुंबईच्या रस्त्यावर ती फिरताना दिसली. त्यामुळे नक्कीच तिच्यासाठी हा अनुभव फारच सुखद असणार हे मात्र नक्की .  एकीकडे तिचा हा रिक्षाने फिरण्याचा तिचा आनंद ती व्यक्त करत असताना दुसरीकडे मात्र तिच्या या फोटोची खिल्लीही उडवली जात आहे. हे फोटो पाहून सोशल मीडियावर काहींना हा तिचा पब्लिसिटी स्टंट वाटत  आहे. शिल्पा तिच्या आगामी सिनेमासाठी प्रमोशन करत असल्याचे यूजर्सना वाटतंय. तुर्तास या फोटोंमुळे ग्लॅमरस आयुष्य जगणारी शिल्पाही सामान्य आयुष्य जगणे पसंत करते हे अधोरेखित झाले आहे. 


शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत असते. नियमित योगाभ्यास करणे शिल्पाच्या रूटीन लाईफचा भाग आहे. अनेकांना योगाभ्सास करणे सर्वात कठीण काम वाटतं. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मानसिक रूपाने आत्मसात करता तेव्हा ती करण्यात काहीच अडचण येत नाही असे शिल्पाचे म्हणणे आहे.

Web Title: When Shilpa Shetty travels by Auto Rickshaw , she expresses her happy journey experience