​जेव्हा ‘वेटरच्या रूपात शाहरुख’ सर्व्ह करतो डीनर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 20:18 IST2016-12-10T20:18:49+5:302016-12-10T20:18:49+5:30

when Shahrukh Khan surprised this family by serving them food at restaurant ; शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हारयल होत आहे. एका हॉटेलमध्ये तो वेटरच्या रूपात एका कुटुंबाला डीनर सर्व्ह करताना दिसतोय.

When 'Shahrukh' serves as a waiter, Dinner ... | ​जेव्हा ‘वेटरच्या रूपात शाहरुख’ सर्व्ह करतो डीनर...

​जेव्हा ‘वेटरच्या रूपात शाहरुख’ सर्व्ह करतो डीनर...

ong>बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हारयल होत आहे. एका हॉटेलमध्ये तो वेटरच्या रूपात एका कुटुंबाला डीनर सर्व्ह करताना दिसतोय. ‘बी माय गेस्ट’ या कॅम्पेनसाठी शाहरुखने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या चाहत्यांना सरप्राईज देताना दिसतो. 

शाहरुखने नुकतेच ‘बी माय गेस्ट’ या कॅम्पेनसाठी शूटिंग पूर्ण केली होती. याचा व्हिडीओ आता रिलीज करण्यात आला आहे. यात शाहरुख खान दुबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याच्या चाहत्यांना सरप्राईज भेट देताना दिसतो. या व्हिडीओतील सर्वांत खास क्षण म्हणजे एका हॉटलेमध्ये डिनरला आलेल्या एका कुटुंबाला जेवन सर्व्ह करण्यासाठी स्वत: शाहरुख वेटर म्हणून त्यांच्या जवळ जातो. तेव्हा फारच मजा येते. हा व्हिडीओ प्रमोशनल असल्याने यातील सर्व गोष्टी स्क्रिप्टेड होत्या. मात्र हा व्हिडीओपाहून शाहरुखच्या चाहत्यांच्या चेहºयावर नक्कीच आनंद येणार आहे. 



शाहरुख खान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित ‘रईस’च्या प्रमोशनात व्यस्त आहे. याच दरम्यान ‘बी माय गेस्ट’ या कॅम्पेनचा हा व्हिडीओ प्रदर्शित झाला असल्याने त्याच्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. ‘रईस’मध्ये शाहरुख संघर्ष करून कसा मोठा व्यवसायी बनतो हे दाखविण्यात आले आहे. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले. एकाच वेळी ९ शहरांत व ५०० स्क्रिनवर हे ट्रेलर दाखविण्यात आले होते. शाहरुखचा रईस २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असून याच दिवशी हृतिक रोशनचा काबिल हा चित्रपट रिलीज होणार असल्याने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त तिकीट युद्ध पहायला मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: When 'Shahrukh' serves as a waiter, Dinner ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.