दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात मोठ्या मेहनतीने शूट करण्यात आला होता काजोल शाहरुचा हा बेड सीन, एकमेकांसोबत दोघेही नव्हते कंम्फर्टेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:21 IST2021-05-06T19:20:45+5:302021-05-06T19:21:25+5:30

२५ वर्षापूर्वीरसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं... राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीतून रोमांसच्या बादशाह यश चोप्रा यांनी रोमँटिक राजला नवी ओळख मिळवून दिली... शाहरुख आणि काजोलची जोडी रातोरात हिट झाली...

when Shahrukh khan Kajol took several times to shoot the bed scene in DDLJ | दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात मोठ्या मेहनतीने शूट करण्यात आला होता काजोल शाहरुचा हा बेड सीन, एकमेकांसोबत दोघेही नव्हते कंम्फर्टेबल

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात मोठ्या मेहनतीने शूट करण्यात आला होता काजोल शाहरुचा हा बेड सीन, एकमेकांसोबत दोघेही नव्हते कंम्फर्टेबल

यश चोप्रा दिग्दर्शित, किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या अभिनयाने नटलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाची जादू आज २५ वर्षा नंतरही कमी झालेली नाही. आजही हा सिनेमा तितक्याच आवडीने बघितला जातो. २५ वर्षापूर्वीरसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं... राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीतून रोमांसच्या बादशाह यश चोप्रा यांनी रोमँटिक राजला नवी ओळख मिळवून दिली... शाहरुख आणि काजोलची जोडी रातोरात हिट झाली.

राज आणि सिमरन अर्थात किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या रोमँटिक जोडीने २५ वर्षापूर्वी निर्माण केलीली जादू आजही चित्रपट रसिकांच्या मनावर गारुड घालतेय. नुकतेच 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाच्या टीमने २५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला होता.  ही अजरामर कलाकृती रुपेरी पडद्यावर साकारण्यापूर्वी सेटवर धमालमस्ती उडाली होती.

विशेष म्हणजे काजोल आणि शाहरुख ख-या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे शूटिंगवेळी दोघेही कधीच सिरियस मूडमध्ये नसायचे. तिथेही मजा मस्ती करत त्यांनी सिनेमाचे शूटिंग केले. अनेकदा काजोल आणि शाहरुख जुन्या आठवणीत रमताना दिसतात.

 

असाच एक खास किस्सा काजोलने एका मुलाखतीत सांगितला होता. सिनेमात दोघांवर एक बेड सीन शूट करायचा होता. बेड सीन असल्यामुळे तो हॉटच असायला पाहिजे असा आदित्य चोप्राचा हट्ट होता. त्यासाठी आदित्यलाचा जास्त मेहनत करावी लागली.

या सीन शूट करतेवेळी शाहरुख काजोल दोघेही इतके हसायचे की, त्यांना सतत रिटेक वर रिटेक करावे लागले. हवा तसा सीन दिग्दर्शकाला मिळतच नव्हता. आम्ही दोघांनीही हा सीन अजिबात सिरियसली घेतला नव्हता.  सीन शूट करतेवेळी शाहरुख डॉयलॉग बोलताना मध्येच हसायचा. असे अनेकदा घडले. शेवटी कसेबसे दोघांनी मिळून हा सीन पूर्ण केला मोकळे झाले. 

Web Title: when Shahrukh khan Kajol took several times to shoot the bed scene in DDLJ