आणि पब्लिकने केली होती सलमान खानची धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:58 PM2020-06-12T12:58:10+5:302020-06-12T12:59:12+5:30

सलमान खानच्या घरासमोरच काही लोकांनी सलमान आणि सोहेलची चांगलीच धुलाई केली होती.

When Salman Khan was beaten up by brother Sohail Khan fans | आणि पब्लिकने केली होती सलमान खानची धुलाई

आणि पब्लिकने केली होती सलमान खानची धुलाई

googlenewsNext
ठळक मुद्देसोहेलने सांगितले होते की, काहीही कारण नसताना एका फॅनने सोहेलवर हात उचलला होता आाणि त्यावेळी त्याच्या मदतीसाठी सलमान खान धावून गेला होता.

सलमान खानने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याचसोबत तो अनेकवेळा लोकांच्या मदतीसाठी धावून जातो. आता देखील कोरोनाच्या संकटात तो अनेक गरजूंना मदत करत आहे. सलमानसाठी त्याचे कुटुंब हे सर्वस्व आहे. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासाठी काहीही करायला तो तयार असतो. सलमान अनेक कार्यक्रमात त्याच्या कुटुंबियांविषयीचे किस्से सांगत असतो. त्याने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्याचा भाऊ सोहेल खान आणि त्याचा एक मजेदार किस्सा सांगितला होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण सोहेलमुळे एकदा चक्क सलमानची धुलाई झाली होती.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. या कार्यक्रमात सलमान खानने वडील सलीम खान आणि भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यासोबत काही महिन्यापूर्वी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात सोहेलने सांगितले होते की, काहीही कारण नसताना एका फॅनने सोहेलवर हात उचलला होता आाणि त्यावेळी त्याच्या मदतीसाठी सलमान खान धावून गेला होता. 

सलमानने पुढे याविषयी सांगितले होते की, सोहेलला मारायला एकदा त्याचा एक फॅन आला होता. घराच्या बाहेर उभा राहून हा फॅन सोहेलला शिवीगाळ करत होता. त्यावर सोहेलने खाली जाऊन विचारले की, काय झाले तू मला शिव्या का देत आहेस... त्यावर त्याच्यासोबत आणखी तीन-चार लोक होते, ते चक्क सोहेलला मारायला लागले. सोहेलला हे लोक काहीही कारण नसताना मारत आहेत हे बघून मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि सोहेलला वाचवण्यासाठी मी तिथे गेलो. मी देखील त्या लोकांना चांगलाच चोप दिला. पण या सगळ्यात त्यांनी देखील माझी धुलाई केली. त्यांच्या हातात एक काठी होती, त्यांनी त्या काठीने माझ्या पाठीवर मारले. त्यावर मी मला लागले... मला लागले... एवढेच ओरडत होतो.  

Web Title: When Salman Khan was beaten up by brother Sohail Khan fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.