जेव्हा सलमान गोविंदाला ‘पार्टनर’ म्हणतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 18:37 IST2016-12-29T18:37:38+5:302016-12-29T18:37:38+5:30

गेल्या काही वर्षांपासून सलमान खान आणि गोविंदा यांच्यात बोलणे बंद आहे. मात्र, सलमान खानच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ...

When Salman calls Govinda a 'partner'! | जेव्हा सलमान गोविंदाला ‘पार्टनर’ म्हणतो!

जेव्हा सलमान गोविंदाला ‘पार्टनर’ म्हणतो!

ल्या काही वर्षांपासून सलमान खान आणि गोविंदा यांच्यात बोलणे बंद आहे. मात्र, सलमान खानच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांमधील मैत्रींचे बंध पुन्हा नव्याने जोडले गेले. गोविंदाने सलमानला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तर ट्विटरवर सलमानने गोविंदाच्या ‘आ गया हीरो’च्या ट्रेलरचे स्वागत करताना, माझा पार्टनर आला, अशा आशयाचे ट्विट केलंय.

{{{{twitter_post_id####}}}}



सलमान खानचा स्वभाव सर्वांना माहितीय. जेव्हा सलमान एखाद्याशी वैरत्व पत्करतो, त्यावेळी तो भल्याभल्यांनाही माफ करीत नाही. गोविंदा आणि सलमानमध्ये गेल्या काही वर्षांपासून बोलणे नाही. गोविंदाने ही कोंडी फोडली. सलमानच्या वाढदिवसानिमित्त गोविंदाने त्याला शुभेच्छा दिल्या. त्यावर सलमानची काय प्रतिक्रिया असेल याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. सलमान खान गोविंदाला माफ करणार का? याबाबत बॉलिवूडमध्ये चर्चा होत असतानाच सलमानने मनाचा मोठेपणा दाखवत गोविंदाचे स्वागत केले.
आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘आ गया हीरो’च्या ट्रेलरवर सलमानने ट्विट केले आहे. ‘आ गया मेरा हिरो, मेरा पार्टनर. सुपर्ब ट्रेलर’ असे म्हणत या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले. यामुळे आता दोघांच्या मैत्रीचे नवे स्वरुप दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकत्र चित्रपटात दिसलेले नाहीत. आता दोघेही चित्रपटात येतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



 

Web Title: When Salman calls Govinda a 'partner'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.