हमारी अधूरी कहानी...! असं काही झालं की, क्षणात भंगलं सलमानचं जुहीसोबत लग्नाचं स्वप्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 08:00 IST2020-12-23T08:00:00+5:302020-12-23T08:00:02+5:30

सलमानच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होतोय...

when salma khan wants to marry juhi chawla but her dad refuse him | हमारी अधूरी कहानी...! असं काही झालं की, क्षणात भंगलं सलमानचं जुहीसोबत लग्नाचं स्वप्न 

हमारी अधूरी कहानी...! असं काही झालं की, क्षणात भंगलं सलमानचं जुहीसोबत लग्नाचं स्वप्न 

ठळक मुद्देजुहीचे म्हणाल तर तिच्या संपूर्ण करिअरमध्ये तिचे नाव कोणत्याही अभिनेत्याशी जोडले गेले नाही. 1992 मध्ये तिने जय मेहतासोबत लग्न केले.

सलमान खान आणि त्याच्या आयुष्याच्याशी संबंधित किस्से कधीच संपणारे नाहीत. भाईजानवर त्याचे चाहते इतके प्रेम करतात की, त्याच्या आयुष्याबद्दलचा प्रत्येक लहान-मोठा किस्सा जाणून घेऊ इच्छितात. सलमान आणि त्याचे लव्ह अफेअर्सची चर्चा आजही होते, ती याचमुळे. आता त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. होय, सलमान खान या मुलाखतीत जुही चावलाबद्दल बोलतोय. कारण काय तर, एकेकाळी सलमान तिच्यावर फिदा होता. इतका की, त्याने तिच्या वडीलांकडे लग्नाची मागणी घातली होती.

सलमान जुहीच्या वडिलांकडे गेला आणि त्याने थेट जुहीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. यानंतर काय झाले, हे सलमानने या मुलाखतीत सांगितले होते.

‘जुही खूप गोड आणि प्रेमळ आहे. मी तिच्या वडिलांनाही जुहीसोबत मी लग्न करू शकतो का? असे विचारले होते. पण तिच्या वडिलांनी मला नकार दिला. कदाचित मी त्यांना आवडलो नसेल. त्यांना काय हवे होते, माहित नाही?’ असे सलमान या मुलाखतीत म्हणाला होता.

 सलमान व जुहीने अनेक सिनेमांत एकत्र काम केले. मात्र या प्रत्येक सिनेमात सलमानचा कॅमिओ होता. दोघे कधीच कोणत्या चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत दिसले नाहीत. ‘दीवाना-मस्ताना’ या सिनेमात जुही व सलमानचे पडद्यावर लग्नही झाले होते. मात्र ख-या आयुष्यात जुहीसोबत लग्न करण्याची त्याची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही.
जुहीचे म्हणाल तर तिच्या संपूर्ण करिअरमध्ये तिचे नाव कोणत्याही अभिनेत्याशी जोडले गेले नाही. 1992 मध्ये तिने जय मेहतासोबत लग्न केले. जय यांच्या पहिल्या पत्नीचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. 
 

Web Title: when salma khan wants to marry juhi chawla but her dad refuse him