प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी पूर्ण नग्न होऊन बीचवर धावली होती, लग्नाआधीच राहिली होती प्रेग्नंनट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 08:00 IST2020-04-14T08:00:00+5:302020-04-14T08:00:00+5:30

1974 साली हे मासिक लाँच होणार होते. तेव्हा मासिकाच्या प्रमोशनसाछी मासिकाचे प्रमुख करंजिया यांनी प्रोतिमांना असे करण्यास सांगितले होते.

  When Pooja Bedi's mother Protima ran naked on Mumbai's Juhu beach Also Pregnant before the wedding-SRJ | प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी पूर्ण नग्न होऊन बीचवर धावली होती, लग्नाआधीच राहिली होती प्रेग्नंनट

प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी पूर्ण नग्न होऊन बीचवर धावली होती, लग्नाआधीच राहिली होती प्रेग्नंनट

प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटी काय करतील याचा नेम नाही. कधी कधी काही सेलिब्रिटींचे फोटो किंवा वागणं पाहून प्रसिद्धीसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे आपण गेल्या काही वर्षात अनुभवलं आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर वारंवार असे सेलिब्रिटींचे प्रसिद्धीचे स्टंट पाहायला मिळतात. मात्र आजपासून जवळपास ४० वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया किंबहुना मीडियाचा इतका गाजावाजा नव्हता त्या काळातही काही सेलिब्रिटी प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करायचे.हे वाचून कदाचित तुम्हाला नवलही वाटेल. मात्र काही सेलिब्रिटी झगमगत्या चंदेरी दुनियेत संधी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होते. ही बाब मॉडेल आणि नृत्यांगणा प्रोतिमा बेदीबाबत तंतोतंत लागू पडते. प्रोतिमा म्हणजे प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांची पहिली पत्नी. दोन वर्षांआधी कबीर बेदी यांनी चौथं लग्न केले होते. चार पत्नींपैकी त्यांची पहिली पत्नी म्हणजे प्रोतिमा बेदी. 

 

कबीर आणि प्रोतिमा यांची लेक म्हणजे अभिनेत्री पूजा बेदी. प्रोतिमा आणि कबीर लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्याचदरम्यान लग्नाआधीच प्रोतिमा प्रेग्नेन्ट राहिल्या होत्या. अशा वादग्रस्त प्रोतिमा यांचं व्यावसायिक जीवनही तितकंच वादळी होतं. मॉडेल असणा-या प्रोतिमा यांनी एका मासिकासाठी बीचवर चक्क नग्न फोटोशूट केलं होतं. त्यावेळी त्यांची लेक पूजा बेदी ४ वर्षांची होती. 'सिनेब्लिट्झ' या मासिकासाठी प्रोतिमा नग्न होऊन बीचवर धावल्या होत्या.

1974 साली हे मासिक लाँच होणार होते. तेव्हा मासिकाच्या प्रमोशनसाछी मासिकाचे प्रमुख करंजिया यांनी प्रोतिमांना असे करण्यास सांगितले होते. मासिकाला हिट करण्यासाठी सिनेब्लिट्झची टीम विवस्र होऊन बीचवर धावणा-या मॉडेलच्या शोधात होती. मात्र त्यासाठी त्या काळात कोणतीही मॉडेल हे करण्यास धजावणार नव्हती.'सिनेब्लिट्झ' मासिकाच्या संपादिका रुसी यांनी प्रोतिमा यांचे नाव पुढे केले. प्रोतिमा यांना याबद्दल विचारले असता त्यांनीही ते मान्य केले होते.

Web Title:   When Pooja Bedi's mother Protima ran naked on Mumbai's Juhu beach Also Pregnant before the wedding-SRJ