हे काय? सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, विश्वास बसत नसेल पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:31 IST2020-05-27T17:29:23+5:302020-05-27T17:31:43+5:30

पतौडी घराणाच्या ‘राजकुमारी’ला लोक भिकारी समजून पैसे देतात तेव्हा...

when people gave money to sara ali khan by assume her as beggar-ram | हे काय? सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, विश्वास बसत नसेल पाहा व्हिडीओ

हे काय? सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, विश्वास बसत नसेल पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देलवकरच सारा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

सारा खान आताश: केवळ सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी राहिलेली नाही. होय, बॉलिवूड स्टार अशी आज तिची ओळख आहे. फार कमी वेळात साराने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. चंचल, खट्याळ सारा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. फनी व्हिडीओ, फोटो असे सगळे ती शेअर करत असते. तूर्तास सारा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ते म्हणजे, तिचा थ्रोबॅक व्हिडीओ.
होय, साराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.  हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे काय काय तर यातील एक मजेशीर किस्सा. साराने या व्हिडीओ एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. एकदा भिकारी समजून लोकांनी चक्क साराला पैसे दिल्याचा हा किस्सा.

ती सांगते, ‘आम्ही त्यावेळी विदेशात व्हॅकेशनवर गेलो होतो. मॉम डॅड, माझा भाऊ, मी असे सगळे सोबत होता़. फिरता फिरता मॉम डॅड दोघेही शॉपिंगसाठी एका दुकानात गेले. मी माझ्या भावासोबत बाहेरच थांबले होते. बराच वेळ होऊनही मॉम डॅड बाहेर आले नाहीत. त्यावेळी  का कुणास ठाऊक मी अचानक डान्स करायला सुरुवात केली आणि तिथल्या लोकांना वाटलेकी, मी भिकारी आहे. त्यामुळे त्यांनी मला पैसे दिले. लोक असे  का करत आहेत हे मला कळेला. पण मी खूश झाले. मॉम डॅड बाहेर आल्यावर मी त्यांना ते पैसे दाखवले. बघा मला पैसे मिळाले, असे मी मोठ्या आनंदात त्यांना म्हणाले. यावर ते काय बोलणार. ते जोरजोरात हसू लागले़. त्यांनी तुला भिकारी समजून पैसे दिले, असे नंतर त्यांनी मला सांगितले,’ साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे अलीकडे  तिचा ‘लव्ह आज कल’ हा सिनेमा रिलीज झाला होता. पण या सिनेमाला म्हणावे तसे यश मिळाले नाही.  लवकरच सारा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत ‘अतरंगी रे’ या सिनेमातही ती मुख्य भूमिकेत आहे.

Web Title: when people gave money to sara ali khan by assume her as beggar-ram