मलायका आणि अर्जुन कपूर कधी करणार लग्न?, पहिल्यांदाच अर्जुन कपूरने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 21:00 IST2019-03-17T21:00:00+5:302019-03-17T21:00:00+5:30

पहिल्यांदाच मलायकोसोबतच्या रिलेशनबाबत विविध खुलासे केले आहेत.

When Malaika and Arjun kapoor Getting marry?, First Time Arjun Kapoor Breaks Silence | मलायका आणि अर्जुन कपूर कधी करणार लग्न?, पहिल्यांदाच अर्जुन कपूरने सोडलं मौन

मलायका आणि अर्जुन कपूर कधी करणार लग्न?, पहिल्यांदाच अर्जुन कपूरने सोडलं मौन

छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या अफेयरबाबत अर्जुन कपूरने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. पहिल्यांदाच मलायकोसोबतच्या रिलेशनबाबत विविध खुलासे केले आहेत. दोघंही एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नुकतेच मलायकानेही अरबाजसोबतचं नातं संपवायचं नव्हतं अस सांगितले.तसेच “प्रत्येकाला जीवनात जोडीदार, नातं हवं असतं. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं होते. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे असंही तिने म्हटलं होते. जे काही झालं चांगलंच झालं हे सांगायलाही ती विसरली नाही. सारं विसरून जीवनात पुढे जाताना ज्याच्यासोबत तुमचं चांगलं नातं निर्माण व्हावं असा एक चांगला मित्र आणि जोडीदार असावा, तसं झाल्यास तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती. 

काही दिवसांपूर्वी अरबाजला एका टॉक शोमध्ये प्रश्न विचारला होता. गर्लफ्रेंड आणि कुटुंबीयांची भेट घडवून आणणार का असा प्रश्न त्याला विचारला होता. “असं व्हायलाच हवं, कारण गेल्या काही महिन्यात जे काही घडलंय त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे” असं त्याने सांगितले होते. जॉर्जियासोबत असलेल्या संबंधांची कबुली त्याने दिली  होती. तसंच अरहानसह आपल्या नात्याबाबतही खुलासा केला. आपल्या मुलांसह बराच वेळ घालवत असल्याचे त्याने सांगितले. बाप असल्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते.

Web Title: When Malaika and Arjun kapoor Getting marry?, First Time Arjun Kapoor Breaks Silence