एका अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाली होती भांडणं, एकमेकांचे ओढले होते केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 11:12 IST2021-03-24T11:01:10+5:302021-03-24T11:12:31+5:30

करिश्मा आणि रवीना एका अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. फराह खानच्या समोर या अभिनेत्रींनी प्रचंड भांडणं केली होती. तिने एका चॅट शोमध्ये याविषयी सांगितले होते.

when Karisma Kapoor and Raveena Tandon fought on set due to ajay devgn | एका अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाली होती भांडणं, एकमेकांचे ओढले होते केस

एका अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाली होती भांडणं, एकमेकांचे ओढले होते केस

ठळक मुद्देरवीना आणि करिश्मा यांच्या भांडणाविषयी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने देखील आतिश फिल द फायर या चॅट शो मध्ये सांगितले होते.

अंदाज अपना अपना या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन आपल्याला एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटात त्या दोघी बेस्ट फ्रेंड्स असल्याचे दाखवण्यात आले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या दोघांमध्ये अबोला होता. या दोघांमध्ये भांडणे होण्यासाठी एक अभिनेता कारणीभूत होता. हा अभिनेता दुसरे कोणीही नाही तर अजय देवगण होता.

अजय आणि रवीना यांचे अनेक वर्षं अफेअर होते. अजय आणि रवीनाने गैर, दिलवाले, एक ही रास्ता, जंग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्यात अनेक वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. पण अजयच्या आयुष्यात करिश्मा कपूर आल्यानंतर त्याने रवीनासोबत ब्रेकअप केले. अजयवर रवीना प्रचंड प्रेम करत होती. त्यामुळे अजय तिच्यापासून दूर गेलेला ती सहनच करू शकली नव्हती आणि तिने डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला असल्याचे नव्वदीच्या दशकात अनेक वर्तमानपत्रात आले होते.

रवीना आणि करिश्मा यांच्या भांडणाविषयी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने देखील आतिश फिल द फायर या चॅट शो मध्ये सांगितले होते. तिने सांगितले होेते की, मी करिश्मा आणि रवीनासोबत एका गाण्याचे चित्रीकरण करत होती. दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीमुळे भांडणं सुरू झाली. ही भांडणं इतकी विकोप्याला गेली की, त्यांनी एकमेकांचे केस देखील ओढले होते. 

रवीनाने एका मुलाखतीत करिश्माचे नाव न घेता सांगितले होते की, एका अभिनेत्रीला माझ्यामुळे असुरक्षित वाटते. त्यामुळे तिने चार चित्रपटांमधून मला काढायला लावले.  

Web Title: when Karisma Kapoor and Raveena Tandon fought on set due to ajay devgn