जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 06:35 PM2023-10-26T18:35:32+5:302023-10-26T18:36:45+5:30

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने वर्षांनंतर तापसी पन्नू आणि स्वरा भास्करसोबत झालेल्या भांडणावर मौन सोडले आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिने तापसी पन्नूला बी-ग्रेड अभिनेत्री का म्हटले होते.

When Kangana Ranaut Called Taapsee Pannu A B-Grade Heroine, Explains Now After All These Years | जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण

जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या बहुप्रतिक्षित 'तेजस' (Tejas Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. उद्या २७ ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत कंगना पूर्ण ताकदीने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मीडियाशी बोलताना अभिनेत्रीने तिच्या जुन्या वादावरही मोकळेपणाने बोलली. कंगनाने सांगितले की ती तापसी पन्नू आणि स्वरा भास्करवर का नाराज आहे.

अलीकडेच, टाईम्स नाऊ नवभारतला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, कंगनाने अनेक वर्षांनंतर तापसीला बी ग्रेड अभिनेत्री का म्हटले होते याचा खुलासा केला. कंगना म्हणते, 'जेव्हा २०१६ मध्ये तापसीला यश मिळाले, तेव्हा तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, कंगनाला डबल फिल्टरची गरज आहे. तापसीच्या या शब्दांना उत्तर देणे मला योग्य वाटले नाही पण माझी बहीण रंगोलीने तिला चोख उत्तर दिले. ती म्हणाला की तापसी तेच चित्रपट करत आहे जे कंगनाने खूप पूर्वी सोडले होते. ती कंगनाची स्टाईलही कॉपी करते. कंगना पुढे म्हणते की, 'तापसी माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि तिने असे बोलायला नको होते.'

कंगनाने स्वरासोबत चांगले बॉन्ड शेअर केले आहेत
स्वरा भास्करबद्दल बोलताना कंगना म्हणाली, 'तनु वेड्स मनूच्या वेळी आम्ही दोघे खूप चांगले मित्र होतो. ती दिवसभर माझा हात धरून हिंडत असे. मी एकदा तिची हेअरस्टाईलही केली होती. पण नंतर अचानक तिला माझ्यासोबत अडचणी येऊ लागल्या.’ कंगना पुढे म्हणते, 'जे लोक जास्त उदारमतवादी आणि सहिष्णू बनतात त्यांना इतरांचा दृष्टिकोन आवडत नाही.'

Web Title: When Kangana Ranaut Called Taapsee Pannu A B-Grade Heroine, Explains Now After All These Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.