जॅकी श्रॉफच्या ‘या’ जॅकेटची किंमत कळाल्यावर तुम्ही व्हाल आश्चर्यचकित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 11:50 IST2018-01-28T06:20:18+5:302018-01-28T11:50:18+5:30

बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ त्याच्या लूकमुळे कायम ओळखला जातो. त्याची स्टाईल कॉपी करण्याचा नव्या दमाचे कलाकारही प्रयत्न करतात. एवढेच ...

When Jackie Shroff's 'Jacket' Price Prices, you'll be surprised! | जॅकी श्रॉफच्या ‘या’ जॅकेटची किंमत कळाल्यावर तुम्ही व्हाल आश्चर्यचकित !

जॅकी श्रॉफच्या ‘या’ जॅकेटची किंमत कळाल्यावर तुम्ही व्हाल आश्चर्यचकित !

लिवूड स्टार जॅकी श्रॉफ त्याच्या लूकमुळे कायम ओळखला जातो. त्याची स्टाईल कॉपी करण्याचा नव्या दमाचे कलाकारही प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर तो त्याच्या लूकला आणि स्टाइलला सातत्याने बदलत असतो. त्याच्या स्टाइल स्टेटमेंटच्या तर चर्चाही होतात. जॅकीने काऊ-बॉय लूकपासून कोट पँटमधला लूक ट्राय केला आहे. नुकतेच त्याने लुईस विटोन या कंपनीचे जॅकेट घातले होते. विमानतळावरचा त्याचा हा स्पोर्टी लूक अनेकांचे लक्ष वेधत होता. पण तुम्हाला या जॅकेटची किंमत कळाल्यावर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या सुप्रीम कलेक्शन जॅकेटची किंमत आहे ३ लाख रुपये.



जॅकेटच्या किंमतीत कोणताही मध्यमवर्गीय माणूस जमिनीचा छोटा तुकडा विकत घेई शकतो. तसेच एखादी परदेशवारीही करु शकतो. एवढेच काय तर घरासमोर स्वप्नवत आवडती गाडी उभी करु शकतो. पांढरे शर्ट, जॅकेट, जीन्स आणि गॉगल घातलेला जॅकी फारच हँडसम दिसत होता यात काही शंका नाही. सध्या जॅकीचा हा लूक सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

जॅकीच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर गेल्या काही महिन्यांमध्ये तो ‘सरकार ३’, ‘हाऊसफुल ३’ आणि ‘फ्रीक्री अली’ सिनेमांत दिसला होता. एटीएम सिनेमात त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. सिनेमाने बॉक्स आॅफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी जॅकीच्या कामाचे कौतुक झाले होते. जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफचे सिनेमे बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करत आहे. टायगरचा ‘बागी-२’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. टायगरसह या सिनेमात त्याची कथित प्रेयसी दिशा पटानीही दिसणार आहे.

Web Title: When Jackie Shroff's 'Jacket' Price Prices, you'll be surprised!