सलमान खानच्या एका फोनवरुन गोविंदाने सोडला होता सुपरहिट सिनेमा, म्हणाला होता- चीची भैया....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 17:25 IST2023-06-06T15:37:28+5:302023-06-07T17:25:12+5:30

जुडवा चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना गोविंदला सलमानने रात्री २-३ च्या सुमारास फोन केला होता.

When govinda leave judwaa film from salman khan actor reveals the real story | सलमान खानच्या एका फोनवरुन गोविंदाने सोडला होता सुपरहिट सिनेमा, म्हणाला होता- चीची भैया....

सलमान खानच्या एका फोनवरुन गोविंदाने सोडला होता सुपरहिट सिनेमा, म्हणाला होता- चीची भैया....

डेव्हिड धवन दिग्दर्शित 'जुडवा' चित्रपटात सलमान खानने डबल रोल केला होता.  प्रेम आणि राज मल्होत्राच्या भूमिकेत, त्याने करिश्मा कपूर आणि रंभासोबत फ्लर्ट केले. 1997 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट हिट ठरला होता, मात्र त्या काळातील सुपरस्टार गोविंदाने एक मोठा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.  'जुडवा'मध्ये गोविंदाची जागा सलमान खानने घेतली होती हे फार लोकांना माहीत नाही. तेही जेव्हा 'हिरो नंबर 1' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.

९० च्या दशकात गोविंदा बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी गोविंदाची कारकीर्द उंचावर होती. त्यानंतर तो बनारसी बाबूचे शूटिंग करत होता आणि त्याला जुडवा चित्रपटाची ऑफर आली. त्यात गोविंदाची भूमिका व्हावी, अशी चित्रपट निर्मात्यांची इच्छा होती. जुडवा चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सलमानने रात्री २-३ च्या सुमारास त्याला फोन केला आणि 'चीची भैया आप और कितनी हिट्स देंगे' असे म्हणाला.

गोविंदाने दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. गोविंदाने मुलाखतीत सांगितले की, ''त्यावेळी माझे करिअर चांगलं चालले होते. मी त्यावेळी बनारसी बाबूचे शूटिंग करत होतो आणि 'जुडवा' हा चित्रपटही माझ्याकडे होता. ज्या दिवसांमध्ये जुडवाचे शूटिंग सुरू होते, त्या दरम्यान एका रात्री २-३ च्या सुमारास मला सलमानचा फोन आला. तो म्हणाला चिची भैया अजून किती हिट देणार. ''

मग गोविंदा म्हणाला, का काय झाले? तेव्हा सलमान खान म्हणाला की, तू आता ज्या जुडवा चित्रपटाचे शूटिंग करत आहेस तो सोडून द्या आणि मला द्या. त्यात काम करू नकोस. त्यानंतर मी सलमानसाठी चित्रपट सोडला आणि त्याला तो प्रोजेक्ट मिळाला. याचा खुलासा गोविंदाने त्याच्या एका मुलाखतीत केला होता.

Web Title: When govinda leave judwaa film from salman khan actor reveals the real story