किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:00 PM2022-07-27T15:00:00+5:302022-07-27T15:00:00+5:30

Aishwarya rai: रणवीरपूर्वी अनेक अभिनेत्री, अभिनेत्यांनी  न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या या कलाकारांचे फोटो व्हायरल होत आहेत. तसंच या फोटोशूटविषय़ी कलाकारांचं मत काय हेदेखील नेटकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

when aishwarya rai shut a journalist who kept on asking why she doesnt do nude scenes | किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली...

किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) न्यूड फोटोशूट करुन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतील पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. यात काही जण त्याला पाठिंबा देत आहेत. तर काही जण विरोध करुन त्याच्यावर टीकास्त्र डागत आहेत. इतकंच नाही तर या चर्चांमध्ये आतापर्यंत न्यूड फोटोशूट करुन चर्चेत आलेल्या कलाकारांचे जुने फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्येच आता अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनची (Aishwarya Rai) एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. यामध्ये न्यूड फोटोशूट करण्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराची तिने बोलती बंद केल्याचं दिसून येत आहे.

रणवीरपूर्वी अनेक अभिनेत्री, अभिनेत्यांनी  न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या या कलाकारांचे फोटो व्हायरल होत आहेत. तसंच या फोटोशूटविषय़ी कलाकारांचं मत काय हेदेखील नेटकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात ऐश्वर्याने एका जुन्या मुलाखतीत थेट उत्तर देत एका पत्रकाराला फटकारल्याचं पाहायला मिळालं.

'तू तुझ्या चित्रपटांमध्ये न्यूड सीन का देत नाही? किंवा चित्रपटांमध्ये तुला न्युडिटी आणि ग्राफिक्सला एक्सप्लोर करायला आवडेल का?' असा प्रश्न एका पत्रकाराने ऐश्वर्याला विचारला होता. यावर ऐश्वर्याने त्याला थेट फटकारलं. "मला असं वाटतंय मी माझ्या गायनाकॉलजिस्टसोबतच चर्चा करतीये. म्हणजे मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे मी नक्की कोणाशी बोलतीये? तू पत्रकार आहेस भावा त्याच कामावर लक्ष दे", असं सडेतोड उत्तर ऐश्वर्याने दिलं.

दरम्यान, ऐश्वर्याने फटकारल्यानंतर या पत्रकाराची बोलती बंद झाली. २००९ मध्ये  ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार होती त्या काळात तिने ही मुलाखत दिली होती. ऐश्वर्या आता पुन्हा एकदा कलाविश्वात सक्रीय झाली आहे. लवकरच ती पोन्नियिन सेलवन या चित्रपटात झळकणार आहे.  या चित्रपटाची निर्मिती मणिरत्नम करत असून यात ऐश्वर्यासह विक्रम चियान, जयम रवि, कार्ति,ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपला हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
 

Web Title: when aishwarya rai shut a journalist who kept on asking why she doesnt do nude scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.