आराध्याचे नाव ठेवण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्याला लागला होता इतका कालावधी, जाणून घ्या इंटरेस्टींग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 17:14 IST2021-07-05T17:13:19+5:302021-07-05T17:14:12+5:30

अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता नंदा, अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या असे सारं बच्चन कुटुंबीय एका फ्रेममध्ये पाहायला मिळते. ऐश्वर्या आणि आराध्या या मायलेकींचा अंदाजही कुणालाही घायाळ करणारा असाच असतो.

When Abhishek bachchan and aishwarya rai bachchan took four months to name daughter Aaradhya | आराध्याचे नाव ठेवण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्याला लागला होता इतका कालावधी, जाणून घ्या इंटरेस्टींग किस्सा

आराध्याचे नाव ठेवण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्याला लागला होता इतका कालावधी, जाणून घ्या इंटरेस्टींग किस्सा

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. 'बच्चन सिर्फ नाम ही काफी है' असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं.बच्चन कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात.ऐश्वर्या आणि अभिषेक हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. 

ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात रस असतो.कोणतीही गोष्ट लगेच बातमी बनते. असंच काहीसं सध्या घडतंय आराध्याबाबत. जन्मापासूनच आराध्या बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. ऐश्वर्या आणि अभिषेक तर आपल्या लाडक्या लेकीचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच आराध्याच्या बाललीला प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतात. 


अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता नंदा, अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या असे सारं बच्चन कुटुंबीय एका फ्रेममध्ये पाहायला मिळते. ऐश्वर्या आणि आराध्या या मायलेकींचा अंदाजही कुणालाही घायाळ करणारा असाच असतो. दोघींनी एकाच रंगाचे ड्रेस परिधान करत चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. आराध्या बच्चनचा जन्म झाला तेव्हा. तिचे नाव ठेवण्यासाठी तब्बल ४ महिने लागल्याचे बोलले जाते.

 

आराध्याचे नाव ठेवण्यावरुन अभिषेक आणि ऐश्वर्याने प्रचंड विचार केला. एकुलत्या एक मुलीचे नाव खूप विचार केल्यानंतर ठेवण्यात आले. आराध्या बच्चन ठेवल्याचे ऐश्वर्या - अभिषेकने जाहीर केले होते. आराध्याची देखभाल आणि त्याची काळजी घेण्याला सुपरमॉम ऐश्वर्यानं प्राधान्य दिलं. त्यामुळेच ऐश्वर्याने अभिनयातून ब्रेक घेत तिचा पूर्ण वेळ आराध्याला दिला होता.       

Web Title: When Abhishek bachchan and aishwarya rai bachchan took four months to name daughter Aaradhya